नाशिक : रविवार कारंजावरील जैन स्थानकात चतुर्मासानिमित्त विराजमान असलेल्या रमणिकमुनीजी यांच्या ५१ व्या वाढदिवसाचे औचित्य साधत सुशील बहु मंडळाच्या वतीने आधाराश्रमातील मुलांना कपड्यांचे आणि ड्रायफू्रट्सचे वाटप करण्यात आले. यावेळी मंडळाच्या अध्यक्ष सीमा खिंवसरा यांनी उपस्थितांचे स्वागत केले. डॉ. सुषमा दुगड, अॅड. आर. डी. बाफणा व श्रद्धा मिटकरी यांनी मुलांना हास्यप्रकाराची प्रात्यक्षिके दाखविली. याप्रसंगी रमणिक मुनीजी यांनी प्रेम, शांती व मैत्रीचा संदेश दिला. यावेळी सिंपल कांकरिया, माया चोरडिया, मंगला बुरड, उमा ओस्तवाल, सुरुची बेदमुथा, आशा छाजेड, लीलाबाई बेदमुथा, पवन बेदमुथा, किशोर खिंवसरा, मुकेश जैन आदी उपस्थित होते. दरम्यान, आनंद मित्रमंडळामार्फत अमरिशभाई मेहता यांचे प्रबोधनात्मक व्याख्यान प.सा. नाट्यगृहात करण्यात आले होते. सूत्रसंचालन सेक्रेटरी जे. सी. भंडारी यांनी केले. लोढा यांनी आभार मानले.