नाशिक : मराठा विद्याप्रसारक शिक्षणसंस्थेच्या निवडणुकीत सत्ताधारी प्रगती आणि विरोधी समाज विकास पॅनलच्या उमेदवारांची घोषणा गुरुवारी (दि. ३) दुपारी केली.दरम्यान, प्रगती पॅनलने विद्यमान सहा संचालकांना पुन्हा संधी दिली असून, समाज विकास पॅनलने तीन संचालकांना पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. प्रगती पॅनलकडून सहा डॉक्टर, एक अभियंता व एक वकील यांना संधीमिळाली आहे, तर समाज विकास पॅनलने दोन डॉक्टर व दोन वकिलांना संधी दिली आहे. प्रगती पॅनलकडून उमेदवारांची घोषणा निवड समितीचे सदस्य सरचिटणीस नीलिमा पवार, माजी मंत्री विनायक पाटील, अॅड. शशिकांत पवार, रामचंद्र बापू पाटील यांनी केली. प्रगती पॅनलचे उमेदवार पुढीलप्रमाणे- अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, सभापती माणिकराव बोरस्ते, उपसभापती राघो अहिरे, सरचिटणीस नीलिमा पवार, चिटणीस डॉ. सुनील ढिकले, नाशिक शहर- नाना महाले, नाशिक ग्रामीण- सचिन पिंगळे, निफाड- प्रल्हाद गडाख, चांदवड- उत्तम भालेराव, नांदगाव- दिलीप पाटील, मालेगाव- डॉ. जयंत पवार, देवळा- डॉ. विश्राम निकम, बागलाण- डॉ. प्रशांत देवरे, दिंडोरी-पेठ- दत्तात्रय पाटील, कळवण-सुरगाणा- अशोक पवार, येवला- रायभान काळे- सिन्नर- हेमंत वाजे, इगतपुरी- भाऊसाहेब खातळे आदींचा प्रगती पॅनलमध्ये समावेश आहे. तर समाज विकास पॅनलच्या उमेदवारांची घोषणा विद्यमान अध्यक्ष प्रताप सोनवणे, सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे व अद्वय हिरे यांनी केली. समाज विकास पॅनलचे उमेदवार पुढीलप्रमाणे- अध्यक्ष प्रताप सोनवणे, सभापती दिलीपराव मोरे, उपसभापती अॅड. रवींद्र पगार, सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे, चिटणीस नानासाहेब बोरस्ते, नाशिक शहर- डॉ. अशोक बच्छाव, नाशिक ग्रामीण- मोहन पिंगळे, निफाड- संपतराव गावले, चांदवड- डॉ. सयाजीराव गायकवाड, नांदगाव- मनसुख पाटील, मालेगाव- काशीनाथ पवार, देवळा- नारायण पवार, बागलाण- दिलीप दळवी, दिंडोरी-पेठ- सुरेश डोखळे, कळवण-सुरगाणा- बाजीराव पवार, येवला- माधवराव पवार, सिन्नर- अशोक मुरकुटे, इगतपुरी- वसंतराव मुसळे आदींचा समावेश आहे.
प्रगती, समाज विकासचे उमेदवार जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2017 1:24 AM