नामपूर : नोकरीच्या मागे न लागता, अडथळे पार करीत उद्योगाची कास धरणारा समाज म्हणून वाणी समाज ओळखला जातो. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून वाणी समाजाने प्रगती साधली आहे, असे प्रतिपादन खासदार उन्मेश पाटील यांनी व्यक्त केले. अध्यक्षस्थानी रेमेन मॅगेसेस पुरस्कारप्राप्त नीलिमा मिश्रा होत्या.येथील लाडशाखीय वाणी समाज मंच मित्रमंडळ संचलित प्रोत्साहन फाउण्डेशन कला मंचतर्फे समाजातील सामाजिक, शैक्षणिक, कृषी, अध्यात्म या क्षेत्रातील कर्तृत्ववान नागरिकांच्या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पाटील बोलत होते. डी. बी. मालपुरे यांनी पुरस्कारार्थींचा परिचय करून दिला. प्रास्ताविक अध्यक्ष गिरीश वाणी यांनी केले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना मिश्रा म्हणाल्या, वयाच्या तेराव्या वर्षी मी समाजसेवेचा निर्णय घेतला. बचतगटाच्या माध्यमातून आज अनेकांना रोजगार देण्याचा प्रयत्न सुरू आहे. या वाटचालीत समाजाच योगदान राहिले आहे. यावेळी डी. बी मालपुरे, प्रा. गहिवरे , विजय भामरे, प्रकाश वाणी शरद नेरकर, भटू वाणी, दगडू राणे, विजया मालपुरे, प्रकाश मालपुरे, कल्पना शेंडे यांनी मार्गदर्शन केले. पूनम अमृतकार यांनी पसायदान सादर केले.पुरस्कारार्थींचा झाला सन्मानप्रशांत कोतकर,(पिंपळनेर, जि. धुळे), राजेंद्र कोठावदे,(धामणगाव, जि. नाशिक), प्रमोद अमृतकर, (चाळीसगाव), सुनील भामरे,(नवापूर), शोभा कोठावदे, हर्षल कोठावदे, कल्पना वाणी, उमाकांत वाकलकर, विजया बाविस्कर, विनोद दशपुते (नाशिक), सुजाता बोरसे (इगतपुरी), सुनील धोंडू मोने (शिरपूर), सुधाकर येवला, (तळेगाव), मुरलीधर नानकर (धुळे), दत्तात्रय वाणी (दिंडोरी), यशवंत अमृतकर (शहापूर), मनोहर पाटकर (बदलापूर), शशिकांत रामदास चिंचोरे (धुळे), दीपाली दत्तात्रय दळवेलकर (पिंपळनेर, जि. धुळे), चंद्रकांत गोपाळ येवला (मुल्हेर, जि. नाशिक), जितेंद्र वसंत वाणी (अमळनेर, जि. जळगाव), अनिल सोनजे, (निजामपूर, ता. साक्र ी), राजेंद्र दत्तात्रय येवले (चाळीसगाव), कल्पना शेंडे (मुंबई), उदय पाटकर( पुणे) यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
वाणी समाजाने साधली प्रगती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 10:32 PM
नामपूर : नोकरीच्या मागे न लागता, अडथळे पार करीत उद्योगाची कास धरणारा समाज म्हणून वाणी समाज ओळखला जातो. प्रतिकूल ...
ठळक मुद्देउन्मेश पाटील : विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार