लोकमत न्यूज नेटवर्क
सिन्नर : भोकणी येथील ग्रामपंचायतीच्या चुरशीच्या लढतीत प्रगती पॅनेलने ९ पैकी ५ जागा जिंकून परिवर्तन ग्रामविकास पॅनेलचा पराभव केला. ‘प्रगती’चे नेते बाजार समितीचे माजी सभापती अरुण वाघ हे याआधीच बिनविरोध निवडून आल्याने या पॅनेलच्या सदस्यांची संख्या सहा झाली आहे. अरुण वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रगती पॅनेलची निर्मिती करण्यात आली होती. वाघ यांनी केवळ विकासाच्या मुद्द्यावर मतदारांना साद घातली होती. त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले. प्रभाग क्रमांक १ मध्ये ग्रामविकास पॅनेलचे ज्योती राजू सानप (४०३), शिवाजी निवृत्ती सानप (३२१), माया आण्णा सानप (४११) यांनी प्रगतीचे सुनील शिवाजी वाघ (१२), शोभा रंगनाथ्लू कुर्हाडे (५३) श्वेता शरद साबळे (४६) तसेच स्वतंत्रपणे निवडणूक रिंगणात उतरलेले सुरेश किसन सानप (१), रंगनाथ्लू रघुनाथ्लू सानप (१२४) यांचा दारुण पराभव केला. प्रभाग क्रमांक २ मध्ये प्रगती पॅनेलचे शरद बाळनाथ्लू साबळे (३८७), अलका रमेश साबळे (४१५), मनिषा सुरेश साबळे (४१५) यांनी ग्रामविकासचे संगीता सुनील साबळे (३३५), शारदा दामू सांगळे (२९८), भास्कर शिवराम साबळे (३४३) यांना पराभवाची धूळ चारली. प्रभाग क्रमांक ३ मध्ये ‘प्रगती’चे कांताराम निवृत्ती कुर्हाडे (३२३), सोनाली तुकाराम डावखर (३२३) यांनी ज्ञानेश्वर रामचंद्र कुर्हाडे (१२०) व अनिता भिवाजी कुर्हाडे (११३) यांना धोबीपछाड दिला.
--------------------
अरुण वाघ यांचे पुन्हा वर्चस्व सिध्द
भोकणी ग्रामपंचायतीवर बाजार समितीचे माजी सभापती, माजी सरपंच अरुण वाघ यांचे वर्चस्व सिध्द झाले आहे. गेल्या दोन पंचवार्षिक निवडणुकीत वाघ यांनी ग्रामपंचायतीची सत्ता काबीज केली असून, विकासकामांच्या माध्यमातून जनाधार टिकवून ठेवण्यात यश मिळवले आहे. यापूर्वी वाघ स्वत: तसेच त्यांच्या पत्नी ज्योती वाघ या सरपंचपदी विराजमान होत्या.
---------------------
फोटो ओळी- सिन्नर तालुक्यातील भोकणी ग्रामपंचायतीवर प्रगती पॅनेलने सत्ता मिळवल्यानंतर पॅनलचे नेते अरुण वाघ व कार्यकर्ते यांनी जल्लोष केला. (२२ भोकणी)
===Photopath===
220121\22nsk_5_22012021_13.jpg
===Caption===
(२२ भोकणी)