घोटी : आॅनलाइन शॉपिंग मुळे स्थानिक व्यवसाय आर्थिक संकटात सापडला असून आॅनलाइन व्यवसाय करणा-या कंपन्या आणि मॉल मधील विदेशी गुंतवणूकी मुळे व्यापा-यांना आर्थिक नुकसान होत असल्याने शासनाच्या व्यापारीविरोधी धोरणाच्या निषेधार्थ घोटी व्यापारी संघटनेच्या वतीने कडकडीत बंद पाळण्यात आला. देशात आॅनलाइन शॉपिंग समजल्या जाणा-या आॅलमार्ट, अमेझॉन, फ्लिपकार्ट तसेच आॅनलाइन व्यवसाय करणा-या मॉलमुळे स्थानिक व्यवसाय आर्थिक संकटात सापडले असल्याने या व्यवसायावर अंकुश आणावा या मागणीसाठी आज घोटी शहरातील व्यापा-यांनी स्वयंस्फूर्तीने आपले व्यवसाय कडकडीत बंद ठेवले.दरम्यान आपल्या मागण्याचे निवेदन व्यापारी बांधवानी तहसीलदार आणि घोटी पोलिसांना दिले.दरम्यान या बंदमध्ये धान्य व्यापारी,इलेक्ट्रॉनिक असोसिएशन आदी सहभागी झाले होते. दरम्यान व्यापा-यांच्या शिष्टमंडळाने तहसीलदारांची भेट घेऊन निवेदन दिले. यात मदनलाल पीचा,अजित पीचा,चंद्रभान गायकवाड, वीरेंद्र बेदमुथा, संपत पीचा, युवराज बागमार, किशोर चोरिडया, मिलिंद श्रीश्रीमाळ,चंद्रकांत वालझाडे,मिलिंद शहा,सुवलाल मोदी,महेश शहाणे,प्रमोद बेदमुथा आदींचा समावेश होता.
आॅनलाइन शॉपिंगच्या निषेधार्थ घोटीत व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 12:44 PM