चांदवड - चांदवड येथील आबड , लोढा,जैन, महाविद्यालयात प्राध्यापक संघटनेच्या वतीने निषेध दिवस पाळण्यात आला. तर सर्व प्राध्यापकांनी काळ्या फिती लावून दिवसभराचे कामकाज केले.व मागण्याचे निवेदन प्राचार्य डॉ. जी.एच.जैन यांना दिले. यावेळी केलेल्या मागण्यामध्ये सातव्या वेतन आयोगाची अमंलबजावणी करावी, भरती प्रक्रिया त्वरीत सुरु करणे , अंशदायी निवृत्ती वेतन योजना रद्द करावी,जुनी पेन्शन योजनेचा लाभ सर्व कर्मचाऱ्यांना देणे परिक्षा, बहिष्कार , आंदोलन कालावधीतील ७२ दिवसाचे वेतन देणे, विना अनुदानित , घड्याळी तास व करार तत्वावर काम करणाºया प्राध्यापंकाचे प्रश्न सोडविणे, त्यांना योग्य वेतन देणे, उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार प्राध्यापकांचे प्रतिनिधीत्व असलेली तक्रार निवारण समिती गठीत करणे, विद्यापीठातील विविध मंडळा वर होणाºया नियुक्तांमध्ये लोकशाही प्रक्रियेचा अवलंब करणे, प्राध्यापकांची निवृत्ती वय मर्यादा युजी.सी.च्या शिफारशीप्रमाणे वाढविणे ,आदि प्रमुख मागण्यासाठी प्राध्यापकक संघटना एम. फुक्टोच्या आदेशान्वये विविध टप्प्यामध्ये आंदोलन करणार आहे.
चांदवड महाविद्यालयाच्या प्राध्यापकांचा निषेध दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2018 4:13 PM
चांदवड - चांदवड येथील आबड , लोढा,जैन, महाविद्यालयात प्राध्यापक संघटनेच्या वतीने निषेध दिवस पाळण्यात आला. तर सर्व प्राध्यापकांनी काळ्या फिती लावून दिवसभराचे कामकाज केले.व मागण्याचे निवेदन प्राचार्य डॉ. जी.एच.जैन यांना दिले
ठळक मुद्देजुनी पेन्शन योजनेचा लाभ