शहरं
Join us  
Trending Stories
1
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
3
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
5
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
6
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
7
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
8
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
9
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
10
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
11
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
12
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
13
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
14
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
16
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
17
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
18
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
19
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
20
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'

निधीअभावी पाच वळण बंधारे रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 12:46 AM

नाशिक : गोदावरी खोºयात मोडणाºया दिंडोरी तालुक्यात वळण बंधारे योजनेंतर्गत अकरा वर्षांपूर्वी मंजूर करण्यात आलेले व त्यासाठी जमिनीचे भूसंपादनही पूर्ण झालेले पाच बंधारे पाटबंधारे खात्याने निधी कमतरतेचे कारण देत रद्द केले आहेत. सुमारे साडेचारशे ते पाचशे कोटी रुपये खर्चाच्या या वळण योजनेसाठी आजवर शंभर कोटी रुपये भूसंपादनावर खर्च केले असून, शेतकºयांच्या जमिनीही खणून ठेवण्यात आल्या आहेत, आता प्रकल्पच रद्द केल्याने आदिवासी शेतकºयांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

ठळक मुद्देपाटबंधारे खाते : जमिनी देणाऱ्या शेतकºयांचा संताप

नाशिक : गोदावरी खोºयात मोडणाºया दिंडोरी तालुक्यात वळण बंधारे योजनेंतर्गत अकरा वर्षांपूर्वी मंजूर करण्यात आलेले व त्यासाठी जमिनीचे भूसंपादनही पूर्ण झालेले पाच बंधारे पाटबंधारे खात्याने निधी कमतरतेचे कारण देत रद्द केले आहेत. सुमारे साडेचारशे ते पाचशे कोटी रुपये खर्चाच्या या वळण योजनेसाठी आजवर शंभर कोटी रुपये भूसंपादनावर खर्च केले असून, शेतकºयांच्या जमिनीही खणून ठेवण्यात आल्या आहेत, आता प्रकल्पच रद्द केल्याने आदिवासी शेतकºयांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.राज्यातील आघाडी सरकारने सन २००७ मध्ये दिंडोरी तालुक्यातील आंबाड, पायरपाडा, शृंगारपाडा, वाघाड-करंजवण व चिमणपाडा या पाच ठिकाणी वळण बंधारे बांधण्यास पाटबंधारे खात्याने मंजुरी दिली होती. या बंधाºयांमुळे या पाच भागात शेकडो एकर जमीन सिंचनाखाली येऊन पुढे मांजरपाडा प्रकल्पाला ही बंधारे सहाय्यभूत ठरून या भागात सुमारे ४०० ते ४५० दशलक्ष घनफूट पाणी साठवण्यास व त्यामुळे प्रश्न कायमस्वरूपी संपुष्टात येण्यास मदत झाली असते. प्रकल्पांना मंजुरी मिळाल्यानंतर पाटबंधारे खात्याकडून जमिनींचे संपादनाचे काम करण्यात आले. त्यासाठी रेडिरेकनर दरानुसार ५१ हजार रुपये एकरी भाव निश्चित करण्यात आल्यावर शेतकºयांनी विरोध दर्शविल्यावर थेट खरेदीद्वारे जमिनी संपादित करण्यात आल्या व शेतकºयांना बारा लाख रुपये हेक्टरी दर देण्यात आला. दरम्यान, या पाचही गावांच्या शेतकºयांमध्ये नाराजी व्यक्त केली जात असून, सोमवारी आमदार झिरवाळ यांच्यासह शेतकºयांनी जिल्हाधिकाºयांची भेट घेऊन निधीची तरतूद करण्याची मागणी केली आहे. म्हणून चूप बसलो...आमदार नरहरी झिरवाळ यांनी वळण बंधारे रद्द करण्याच्या पाटबंधारे खात्याच्या कृतीबद्दल नाराजी व्यक्त केली. सरकार फक्त घोषणा करते, कार्यवाही करीत नाही याचा अनुभव खूप वेळा आल्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आपण काही न बोलता चूप बसलो, असे सांगितले.