नाशिक : इंग्रजी भाषिक साहित्यिक नयनतारा सहगल यांना यवतमाळमध्ये होत असलेल्या ९२व्या मराठी साहित्य संमेलनाचे निमंत्रण पाठविण्यात आले व ते नंतर रद्दही केले गेले. त्यामुळे राज्यभरात साहित्यिक वर्तुळात पडसाद उमटत आहेत. संमेलन आयोजकांसह राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीदेखील याबाबत जबाबदारी झटकली आहे. घडलेल्या प्रकाराबाबत शहरातील काही साहित्यिकांशी याबाबत संवाद साधला असता तीव्र नाराजीचा सूर उमटला. जे काही घडले त्यामुळे साहित्य चळवळीची प्रतिमा डागाळल्याचे बोलले जात आहे.सहगल निमंत्रण वाद उद्भवल्यामुळे शहरातील बहुतांश लेखक, कवींनीदेखील या साहित्य संमेलनावर बहिष्कार टाकला असून, सुसंस्कृत समृद्ध परंपरा जोपासणाऱ्या साहित्यकांनी अशा संमेलनापासून चार हात लांब रहावे, असे आवाहनही केले आहे. एकूणच साहित्य संमेलन आयोजकांकडून करण्यात आलेला हा प्रताप निंदनीय असल्याचे साहित्यिकांच्या वर्तुळात मानले जात आहे. एखाद्या गावखेड्यात राहणारा व्यक्तीदेखील, असा माणसुकीच्या विरुद्ध वागत नाही आणि वागणार नाही. पाहुणे म्हणून निमंत्रण पाठवायचे आणि नंतर कार्यक्रमाला येऊ नका म्हणून निमंत्रण रद्द करून टाकायचे, असे अशिक्षित वर्गदेखील करू शकत नाही; मात्र साहित्य संमेलन भरवणाºया मंडळींनी हा प्रताप करून दाखविल्याच्या संतप्त प्रतिक्रया उमटत आहेत. माजी वनधिपती ज्येष्ठ लेखक विनायकदादा पाटील, सार्वजनिक वाचनालयाचे पदाधिकारी प्रा. शंकर बोºहाडे, लेखिका रेखा भंडारी, कवी रवींद्र मालुंजकर, लेखक उत्तम कोळगावकर यांनी सेहगल निमंत्रण वाद हा अशोभनीय असून निंदणीय असाच असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या संमेलनाला नाशिक जिल्ह्यातून जाणाºया साहित्यिकांच्या संख्येवर परिणाम होणार आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या पदाधिकारी असलेल्या डॉ. अरुणा ढेरे हे संमेलनाचे अध्यक्षपद भुषवित असल्यामुळे नाशिकमधील साहित्यिकांची संमेलनाला मोठी हजेरी राहणार होती; मात्र आता हे चित्र बदलणारे दिसत आहे.--
साहित्यिकांकडून निषेध : सेहगल निमंत्रण वादातून समाजात वेगळा संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2019 6:58 PM
सहगल निमंत्रण वाद उद्भवल्यामुळे शहरातील बहुतांश लेखक, कवींनीदेखील या साहित्य संमेलनावर बहिष्कार टाकला असून, सुसंस्कृत समृद्ध परंपरा जोपासणाऱ्या साहित्यकांनी अशा संमेलनापासून चार हात लांब रहावे, असे आवाहनही केले आहे.
ठळक मुद्देसाहित्यिक वर्तुळात पडसाद उमटत आहेतसाहित्य संमेलनावर बहिष्कार