ओझरटाऊनशिप : पन्नास मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या कॅरी बॅग आणि युज अँण्ड थ्रो थर्मोकोल वापरावर ओझर नगरपरिषद हद्दीत दिनांक १ जुलै पासून बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती मुख्याधिकारी डाँ. दिलीप मेनकर यांनी दिली.
व्यापारी प्रतिनिधी,प्लास्टिक खरेदी विक्री ओझर नगर परिषद आयोजित व्यापारी प्रतिनिधी, प्लॅस्टिक खरेदी ,विक्री व्यापारी,आणि व्यावसायिक यांच्या बैठकीस मार्गदर्शन करताना मुख्याधिकारी डाँ.मेनकर यांनी ओझर नगरपरिषद हद्दीत १ जुलै पासून पन्नास मायक्रॉन पेक्षा कमी जाडी असलेल्या प्लॅस्टिक कॅरी बॅग व युज अँण्ड थ्रो थर्मोकोल वापरावर बंदी घालण्यात आली आहे.
एक तारखेपासून सर्वच व्यापार्यांनी या कमी जाडीच्या बॅगचा वापर करू नये. त्याना ग्राहकांनी आणि नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन केले. या कमी जाडीच्या प्लॅस्टिक बॅगचा वापर करणाऱ्यावर कारवाई केली जाईल असा इशाराही डाँ.मेनकर यांनी दिला.
बैठकीसाठी ओझर किराणा आणि धान्य असोसिएशनचे अध्यक्ष संजय पगार, कापड दुकान असोसिएशनचे विष्णूपंत पवार , फेरूमल फुलवाणी, विनय बोरस्ते, पंखही शहा, हरिश माहेश्वरी ,अच्युत आढाव ,भारत वाणी, बिडवे यांचे सह प्लॅस्टिक खरेदी विक्री, किराणा, धान्य,रेडिमेड कपडे , मोबाईल, आदी व्यवसायिकासह नगरपरिषद कर्मचारी उपस्थित होते.