ओझरटाऊनशिप : पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या कॅरीबॅग आणि यूज अँड थ्रो थर्मोकोल वापरावर ओझर नगरपरिषद हद्दीत दिनांक १ जुलैपासून बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती मुख्याधिकारी डाॅ. दिलीप मेनकर यांनी दिली. व्यापारी प्रतिनिधी, प्लास्टिक खरेदी विक्री ओझर नगर परिषद आयोजित व्यापारी प्रतिनिधी, प्लास्टिक खरेदी विक्री व्यापारी आणि व्यावसायिक यांच्या बैठकीस मार्गदर्शन करताना मुख्याधिकारी डाॅ. मेनकर यांनी ओझर नगरपरिषद हद्दीत १ जुलैपासून पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडी असलेल्या प्लास्टिक कॅरी बॅग व यूज अँड थ्रो थर्मोकोल वापरावर बंदी घालण्यात आली आहे. एक तारखेपासून सर्वच व्यापाऱ्यांनी या कमी जाडीच्या बॅगचा वापर करू नये. त्यांना ग्राहकांनी आणि नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले. या कमी जाडीच्या प्लास्टिक बॅगचा वापर करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असा इशाराही डाॅ. मेनकर यांनी दिला. बैठकीसाठी ओझर किराणा आणि धान्य असोसिएशनचे अध्यक्ष संजय पगार, कापड दुकान असोसिएशनचे विष्णूपंत पवार, फेरूमल फुलवाणी, विनय बोरस्ते, पंखही शहा, हरिश माहेश्वरी, अच्युत आढाव, भारत वाणी, बिडवे यांच्यासह प्लास्टिक खरेदी विक्री, किराणा, धान्य, रेडिमेड कपडे, मोबाईल आदी व्यवसायिकांसह नगरपरिषद कर्मचारी उपस्थित होते.
५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या बॅग वापरावर बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 4:12 AM