शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
2
"लेबनानमधील पेजर हल्ला हा इस्रायलचा 'मास्टरस्ट्रोक', भारतात जर असा प्रयत्न झाला तर..."
3
हरियाणा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला धक्का; कोर्टाचा आदेश, "आत्मसमर्पण करा, अन्यथा..." 
4
तिरुपती लाडू भेसळ प्रकरणाचा तपास एसआयटीकडून स्थगित, सांगितलं 'हे' कारण...
5
विराट कोहलीपेक्षा अब्दुला शफीकचा रेकॉर्ड चांगला आहे; पाकिस्तानच्या कर्णधाराचा दावा
6
"अंबानींच्या लग्नावर करोडोंचा खर्च, पण शेतकरी...", राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
7
Badlapur Sexual Assault Case: मोठी बातमी! बदलापूर प्रकरणी शाळेच्या ट्रस्टींना झटका; कोर्टाने अटकपूर्व जामीन नाकारला
8
रोहित की गंभीर? कानपूर टेस्टमध्ये ट्विस्ट आणण्यात नेमकं कुणाचं डोकं?
9
सासूच्या मृत्यूची बातमी, तरीही सेटवर हसत होती 'ही' अभिनेत्री, नवऱ्याने असं केलं रिएक्ट
10
“भाजपासाठी महाराष्ट्र हे ATM, मोदी-शाह यांच्या दौऱ्याचा मविआलाच फायदा”; काँग्रेसची टीका
11
"विमानांप्रमाणे आता एसटीच्या ई- शिवनेरी बसमध्ये दिसणार शिवनेरी सुंदरी’’, भरत गोगावले यांची घोषणा
12
Irani Cup 2024 : मैं हूँ ना! मुंबईचा खडतर प्रवास; पण अजिंक्य रहाणेचा 'संयम', अय्यर-सर्फराजची चांगली साथ
13
'घड्याळ' चिन्हाबाबत आजही सुनावणी झालीच नाही; सुप्रीम कोर्टाने दिली पुढची तारीख
14
“आमचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा मनोज जरांगे असतील”; तिसऱ्या आघाडीतील नेत्याचे मोठे विधान
15
जय पवार की अजित पवार, बारामतीतून कोण लढणार? प्रदेशाध्यक्षांनी गोंधळ संपवला
16
"तुझ्या भावाकडून सुंदर मूल हवंय"; दिरासोबत पळून गेली बायको, नवरा म्हणतो, मला वाचवा कारण...
17
'219 मंदिरांची विटंबना, मूर्तींची तोडफोड', उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा धक्कादायक दावा
18
"लव्ह जिहाद, व्होट जिहाद म्हणून फडणवीस यांनी केला समतेच्या मूल्याचा अपमान, जाहीर माफी मागा’’, काँग्रेसची मागणी 
19
जय शाहांचा वारसदार कोण होणार? BCCI सचिव पदासाठी आशिष शेलारांसह 'ही' ४ नावं चर्चेत
20
धक्कादायक! वाराणसीमधील १० मंदिरांमधून हटवली साईबाबांची मूर्ती, समोर आलं असं कारण

महामोर्चाचा शहरातून दुचाकी रॅलीने प्रचार

By admin | Published: November 18, 2016 12:10 AM

जुना मार्ग निश्चित : ईदगाह मैदानावर व्यासपीठाची उभारणी, तयारी पूर्णत्वास

नाशिक : दलितांवरील अत्याचाराची चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, दलितांच्या संरक्षणार्थ अ‍ॅट्रॉसिटी कायदा अधिक कडक करावा, मराठा व मुस्लिमांना आरक्षण द्यावे, अ‍ॅट्रॉसिटी अशा विविध मागण्यांसाठी येत्या शनिवारी (दि.१९) महामोर्चा काढण्यात येणार आहे. या महामोर्चाच्या प्रचारासाठी शहरातून दुचाकी रॅली गुरुवारी (दि.१७) काढण्यात आली.दलित, ओबीसी, मुस्लीम समाजाच्या वतीने काढण्यात येणाऱ्या महामोर्चासाठी अवघे शहर सज्ज झाले आहे. या मोर्चाच्या नियोजनासाठी पाचशे स्वयंसेवक नियुक्त केले जाणार असून, विविध सामाजिक संघटनांनी पिण्याचे पाणी, खाद्यपदार्थ व अल्पोहाराची व्यवस्था करण्याची जबाबदारी घेतली आहे. गुरुवारी रात्री अंबड लिंकरोडवरील म्हाडा वसाहतीमध्ये महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेण्यात आली. दरम्यान, ईदगाह मैदानापासून मोर्चाला प्रारंभ होणार असून, या मैदानावर व्यासपीठ उभारणी करण्यात आली आहे.राजीवनगर, सातपूर, गंजमाळ, पंचशीलनगर, भीमनगर, उपनगर, आंबेडकरनगर, नाशिकरोड, देवळाली कॅम्प, विहितगाव परिसरात निळे ध्वज लावण्यात आल्याने संपूर्ण शहर निळ्या ध्वजांनी सजले आहे. शहर व परिसरात महामोर्चाची जय्यत तयारी सुरू असून, गोल्फ क्लब मैदान येथून शनिवारी मोर्चाला सकाळी ११ वाजता सुरुवात होणार आहे. या मोर्चामध्ये बौद्ध, इतर मागासवर्गीय, अनुसूचित जाती-जमाती, मुस्लीम, ख्रिश्चन या सर्व जाती-धर्माच्या विविध संघटनांचा सहभाग असणार असल्याची माहिती नियोजन समितीने दिली आहे. दुचाकी रॅलीला सकाळी राजीवनगर येथून सुरुवात झाली. रॅली कलानगर, इंदिरानगर, विनयनगर, वडाळानाका, सारडासर्कल, शालिमार, सीबीएस, त्र्यंंबकरोड, सातपूर, अंबड लिंकरोडवर पोहचली. रॅलीमध्ये युवक निळे फेटे बांधून सहभागी झाले होते. दुचाकींना झेंडे लावण्यात आले होते.