नाशिकरोड : फळे, भाजीपाला उत्पादनांच्या निर्यातीस प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात फायओसॅनिटरी प्रमाणीकरण यंत्रणा बळकटीकरणासाठी सन २०१५-१६ मध्ये योजना राबविण्यास मान्यता देण्यात आल्याची माहिती विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.या योजनेंतर्गत राज्यात द्राक्ष पिकासाठी असलेल्या ग्रेपनेटच्या धर्तीवर मॅँगोनेट, व्हेजनेट या दोन प्रणाली विकसित करण्यात येत असून, ग्राहकांना ट्रेसेबिलिटी उपलब्ध करून देणे. फळे, भाजीपाला आदि कृषी उत्पादनांचे निर्यातीस प्रोत्साहन देऊन निर्यात वाढविणे, तसेच निर्यात विषयक कामासंबंधीचे मनुष्यबळ प्रशिक्षित करणे असा या योजनेमागचा मुख्य उद्देश आहे. या योजनेत नाशिक महसूल विभागातील नाशिक, जळगाव व अहमदनगर या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला असून, शेतांची नोंदणी करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात नोंदणीची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हानिहाय स्वतंत्र समन्वयक व नोडल अधिकारी म्हणून कृषी उपसंचालक नरेंद्र आघाव जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालय नाशिक मोबाइल- ९४२३०८०९२४, कृषी उपसंचालक पी. के. पाटील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जळगाव मोबाइल- ७५८८८१३४०२ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
कृषी उत्पादन निर्यातीस प्रोत्साहन
By admin | Published: September 30, 2015 11:19 PM