नाशिक : पवित्र प्रणालीद्वारे नाशिक जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत रुजू झालेल्या १८० नवीन शिक्षकांना शैक्षणिक उपक्रम, शिक्षकांची क्षमता, कार्यपद्धती आदी बाबींवर मार्गदर्शन करण्यासाठी कार्यशाळा घेण्यात आली. जिल्हा परिषदेच्या शाळेत तळागाळातील विद्यार्थी शिक्षण घेतात, त्यांचे भविष्य शिक्षकांच्या हाती असून, केवळ शिक्षकच त्यांना घडवू शकतो. त्यामुळे आपल्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गरजा ओळखून त्यांना मार्गदर्शन करण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी केले.कार्यशाळेसाठी शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर, प्राचार्य योगेश सोनवणे, प्राचार्य बाविस्कर, सदगीर, अनिता देशमुख, प्रकाश चव्हाण, देवेंंद्र पाटील, वैशाली भामरे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना भुवनेश्वरी यांनी, शिक्षक हा रोल माडेल असून, आपल्या विद्यार्थ्यांच्या अंगी नेमकी कोणती कौशल्ये आहेत हे ओळखू शकतात त्यामुळे नवीन शिक्षकांकडे काही कौशल्य असतील व वेगळ्या वाटेने शाळेची गुणवत्ता व विद्यार्थी विकास करायचा असल्यास त्यांनी प्रयत्न करावेत.यावेळी प्रकाश चव्हाण, देवेंद्र पाटील, वैशाली भामरे यांना आपले उपक्रम मांडण्याची संधी देण्यात आली. त्यांनी शाळा व विद्यार्थ्यांसाठी राबविलेले प्रकल्प व प्रयत्नांचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. त्यात प्रकाश चव्हाण यांनी स्वत: शाळेचे सात वर्षे वीज बिल भरून बंद पडणाºया शाळेचा पट १८ वरून ४५ नेला याची माहिती दिली, तर देवेंद्र पाटील यांनी साप्ते शाळेतील विविध उपक्रम ज्ञान रचनावादी पद्धतीने अध्ययनासाठी तयार केलेले कक्ष, अभ्यास फळे, फिरते वाचनालय आदी उपक्रमांची माहिती दिली. वैशाली भामरे यांनी तंत्रज्ञानाचा अध्यापनात केला जाणारा वापर आदी विषयांवर मार्गदर्शन केले. आभार अनिता देशमुख यांनी मानले. यावेळी अधिकारी व शिक्षक उपस्थित होते.शिक्षण पद्धतीतील बदलाची माहितीप्राचार्य योगेश सोनवणे यांनी ‘मी शिक्षकीपेशा का स्वीकारला?, भारतीय शिक्षण पद्धतीतील बदल’ याविषयी माहिती दिली. तसेच महत्त्वाच्या शासन निर्णयांची ओळख व शिक्षणातील नवीन विचार प्रवाहातील ४४ मुद्द्यांची ओळख शिक्षकांना करून देण्यात आली. शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर यांनी शिक्षकांशी संवाद साधला. त्यात नवीन शिक्षकांना सेवापुस्तक भरणे, गोपनीय अहवाल, सेवाशर्थ नियम व अपील रूल, मत्ता व दायित्व याबाबत मार्गदर्शन केले.
शिक्षकांना कार्यपद्धतीचे उद्बोधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2019 12:13 AM