शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
3
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
4
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
5
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
6
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
8
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
9
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
10
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
11
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
12
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
13
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
14
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
15
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
16
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
17
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
18
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
19
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...

उमेदवारीसाठी घटस्थापनेचा मुहूर्त

By admin | Published: September 13, 2014 9:13 PM

उमेदवारीसाठी घटस्थापनेचा मुहूर्त

नाशिक : विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्याने जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले असून, शासकीय यंत्रणेनेही आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू केली आहे. ठिकठिकाणच्या तहसीलमध्ये आचारसंहितेसंदर्भात बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. गावागावांत उमेदवारीबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत. विविध पक्षांतील इच्छुकांनी आधीपासूनच निवडणुकीची तयारी सुरू केली असली तरी तिकीट मिळविण्याच्या स्पर्धेत आपण मागे राहायला नको यासाठी काळजी घेतली जात असून, प्रत्येकजन आपापल्यापरीने व्यूहरचना करत आहे. दरम्यान, सध्या पितृ पंधरवडा सुरू असल्याने त्यानंतरच उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला वेग येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कार्यकर्त्यांच्या बैठका आणि इतर कामांमध्ये सध्या इच्छुक व्यस्त असल्याचे दिसून येते.मनमाड : विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्याने राजकीय रणधुमाळी सुरू झाली असून, २० सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार असले तरी, सर्वत्र अशुभ मानला जाणारा पितृपंधरवडा सध्या सुरू असल्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी त्याचा अडसर निर्माण होणार आहे. बहुतांश उमेदवार सर्वपित्री अमावास्या संपल्यानंतर घटस्थापनेचा मुहूर्त साधण्याची शक्यता आहे.सध्या पितृपंधरवडा सुरू असून, या दिवसात स्वर्गाचे दार उघडले जाते आणि आपले मृत पूर्वज जेवायला येतात या भावनेतून घराघरांतून श्राद्ध घालण्यात येते. पूर्वापार चालत आलेल्या परंपरेनुसार पितृपंधरवड्यास अशुभ मानण्यात येत असल्याने या कालावधीत शुभ कामे करण्यात येत नाही. या परंपरा आजची तरुण पिढी मानत नसली तरी काही अंशी भीतीपोटी का होईना, पण या पंधरवड्यात नवीन वस्तू खरेदी करणे किंवा चांगले काम हाती घेण्यास कोणी धजावत नसल्याचे पहावयास मिळते. बहुतांश राजकारणी मंडळी राजकीय निर्णय मुहूर्त पाहून घेत असल्याचे दिसून येते. इतकेच काय तर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीसुद्धा कोणता दिवस व कोणती वेळ लाभदायक आहे हे पाहिले जात असल्याचा आजवरचा अनुभव आहे. नुकत्याच विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून, २० ते २७ तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. याच कालावधीमध्ये पितृ पंधरवडा असून, त्यानंतर २५ तारखेला घटस्थापनेचा मुहूर्त बहुतांश उमेदवार साधणार असल्याचे बोलले जात आहे.येवला : विधानसभा निवडणूक जाहीर होताच छावा मराठा संघटनेने राज्यात २५ उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा करीत निवडणुकीचा बिगुल वाजविला.संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विलास पांगारकर यांनी येवला येथे पत्रकार परिषद घेऊन येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघातून येवला तालुकाध्यक्ष नवनाथ अहेर हे उमेदवार असतील असे जाहीर केले. संघटनेची मजबुती व मजबुतीमधून राजकारण हा उद्देश असल्याचे पांगारकरांनी सागितले. आरक्षणाबाबात शिवसेनेने आपली भूमिका जाहीर न केल्यास सेनेच्या विरोधातही निवडणूक लढण्याचा इरादा त्यांनी स्पष्ट केला. (लोकमत चमू)४विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता निवडणूक विभागातर्फे जाहीर करण्यात आली, या पार्श्वभूमीवर इगतपुरी तहसील कार्यालयात तहसीलदार महेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला क्षेत्रीय अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी तहसीलदार पवार यांनी आदर्श आचारसंहितेचे नियम सांगून त्यावर अंमलबजावणी करण्याविषयी मार्गदर्शन केले. राजकीय पदाधिकाऱ्यांना आपल्या परिसरातील होर्डिंग्ज, बॅनर आदि काढण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. फिरते पथक, व्हिडीओ पाहणी, व्हिडीओ सर्वेक्षण, आचारसंहिता कक्ष आदि मंडळींना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. या बैठकीला पंचायत समिती माजी सभापती कावजी ठाकरे, दौलत बोंडे, बाळासाहेब धुमाळ, माजी उपनगराध्यक्ष सुनील रोकडे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष प्रल्हाद जाधव यांच्यासह १६ क्षेत्रीय अधिकारी, नायब तहसीलदार संघमित्रा बाविस्कर, नायब तहसीलदार जितेंद्र केदारे, कृषी अधिकारी अजय सूर्यवंशी आदि उपस्थित होते. ४दिंडोरी : निवडणूक जाहीर होताच दिंडोरी-पेठ मतदारसंघातील राजकीय वातावरण तापू लागले असून, उमेदवार कोण याची चर्चा रंगू लागली आहे. दिंडोरी-पेठ विधानसभा मतदारसंघातून पुन्हा नशीब अजमावण्यासाठी विद्यमान आमदार धनराज महाले सज्ज असून, विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजनाच्या धडाक्याने त्यांनी मतदारसंघ पिंजून काढला आहे. त्यांना पेठचे जिल्हा परिषद सदस्य तथा तालुकाप्रमुख भास्कर गावित यांची स्पर्धा असून, जर उमेदवारी मिळाली नाही तर गावित काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादीत रामदास चारोस्कर, नरहरी झिरवाळ या दोन माजी आमदारद्वयींच्या रस्सीखेचीत माजी समाज कल्याण सभापती वसंत वाघ हेही स्पर्धक असून, कुणीच थांबायच्या पवित्र्यात नसल्याने बंडखोरी अटळ असल्याची चर्चा रंगत आहे. सर्वांच्या नजरा मनसेच्या भूमिकेकडे लागल्या असून, मनसेने आपला निर्णय अद्यापही गुलदस्त्यात ठेवला असून, वेट अन् वॉचची भूमिका घेतल्याने चर्चांना ऊत आला आहे. माकपकडून यंदा निवृत्त सनदी अधिकारी टी.के. बागुल यांनी लढण्याची तयारी केल्याने रंगत वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ४त्र्यंबकेश्वर विधानसभेच्या निवडणुकीचे कामकाज इगतपुरी तहसील कार्यालयातच करावे, अशा आशयाचे निवेदन जयकिसान फार्मर्स फोरमच्या वतीने तहसीलदार महेंद्र पवार यांना देण्यात आले. इगतपुरी-त्र्यंबकेश्वर या विधानसभा मतदारसंघाचे लोकसभेचे कामकाज त्र्यंबकेश्वर येथे घेण्यात आले होते. दरम्यान, इगतपुरी तालुका मुख्यालय असून, आजपर्यंत सर्व निवडणुका इगतपुरी मुख्यालयी झाल्या आहेत. या मतदारसंघात इगतपुरी तालुक्यातील सर्वात जास्त गावे जोडलेली आहेत. इगतपुरी सर्व दृष्टीने अनुकूल असून, या ठिकाणीच निवडणूक केली तर मतदारांची गैरसोय होणार नाही, असेही निवेदनात म्हटले आहे. याप्रसंगी बाळासाहेब धुमाळ, राजू गांगड, शहराध्यक्ष राजू देवळेकर, सोमनाथ घारे, मीरा भोईर उपस्थित होते.