शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
2
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
3
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
4
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
5
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
6
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
7
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
9
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
10
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
11
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
12
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
13
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
14
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
15
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
16
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
17
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने नोकऱ्यांवर गदा? भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचे भविष्य अंधारात
19
ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड! भारतानंतर IPL लिलावात कोणत्या देशाच्या खेळाडूंची सर्वाधिक नावे?
20
कडक सॅल्यूट! जन्मापासूनच दिसत नव्हतं; नेत्रदिपक कामगिरी करत झाल्या IFS अधिकारी

सोशल मीडियावर वाढला राजकीय पक्षांचा प्रचार

By admin | Published: February 11, 2017 12:03 AM

मनपा निवडणूक : ध्वनीफीत, पोस्टरबाजी सुरू

पंचवटी : महापालिका पंचवार्षिक निवडणुकीच्या रिंगणात उभ्या राहिलेल्या राजकीय पक्षांच्या सर्वच उमेदवारांनी आपण आपल्या परिसरात कशा पद्धतीने काम केले आहे किंवा करणार आहे याबाबत ध्वनीफीत तयार करून सोबत पोस्टरबाजी करून सोशल मीडियावर प्रचाराचा वेग वाढविला आहे. महापालिका पंचवार्षिक निवडणुकीला अवघे दहा दिवस शिल्लक असून, यंदा प्रभाग रचना मोठी असल्याने प्रत्येक मतदारांची भेट घेणे शक्य होत नसल्याने उमेदवारांनी सोशल मीडियाला हाताशी धरून फेसबुक, व्हॉट््सअ‍ॅप माध्यमातून प्रचार सुरू केला आहे. उमेदवाराच्या समर्थनार्थ ज्या त्या उमेदवारांनी आपापल्या परिसरात राहणाऱ्या मतदारांचा, तर कोणी कार्यकर्त्यांचा स्वतंत्र प्रभागनिहाय ग्रुप तयार करून त्यावर दैनंदिन प्रचार केलेल्या ठिकाणांचे फोटो, तर कोण उमेदवार कसा आहे, तो निवडून आला तर काय करणार याबाबतच्या ध्वनीफीत तयार करून निशाणी व उमेदवारांच्या छायाचित्रांचे पोस्टर अपलोड करण्याच्या कामाला मोठी गती दिलेली आहे. पॅनल पद्धत असल्याने सर्वच चारही उमेदवारांचे फोटो असलेले पोस्टर, प्रभाग क्रमांक व पक्ष असा उल्लेख पोस्टरबाजीत असून, सध्या प्रत्येक गु्रपवर तसेच फेसबुकसारख्या सोशल मीडियावर भावी लोकप्रतिनिधींसह सध्याच्या विद्यमान लोकप्रतिनिधींचे पोस्टर्स झळकत आहेत. प्रभागात चार उमेदवार असले तरी प्रत्येक उमेदवार हा आपल्या मतदारांना व्हॉटस्अ‍ॅपद्वारे मेसेज पाठवित असल्याने एकाच मतदाराच्या मोबाइलवर किमान चारवेळा हा मेसेज फिरत असल्याने त्यांना मोबाइल हॅँग होण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.