महापालिकेचे अंदाजपत्रक लवकरच महासभेत
नाशिक : महापालिकेचे २०२१-२२ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक लवकरच महासभेत मांडण्यात येेणार आहे. महापालिकेच्या स्थायी समितीने सादर केलेल्या अंदाजपत्रकात आयुक्तांनी बदल केले असून, त्यात अनेक नागरी कामांचा समावेश केला आहे. मात्र, त्यानंतरही सध्या काम सुरूच असून, अद्यापही हे काम पूर्ण झालेले नाही.
---
कंत्राटी कामगारांना कायम करण्याची मागणी
नाशिक : महापालिकेच्या वतीने सध्या वैद्यकीय विभागात मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया राबवली जात आहे. कोरोना संकटामुळे तीन महिने कालावधीसाठीच त्यांची नियुक्ती केली जात आहे. मात्र मुळातच कोरोनासारख्या आजारावर मात करण्यासाठी जोखीम पत्करून काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या कामाचा अनुभव लक्षात घेता त्यांना महापालिकेच्या सेवेत कायम करावे, अशी मागणी या कर्मचाऱ्यांनी केली आहे.
----
स्वच्छ शहर स्पर्धेच्या निकालाकडे लक्ष
नाशिक : केंद्र शासनाच्या स्वच्छ शहर सर्वेक्षण स्पर्धेत नाशिक महापालिकेची पाहणी गेल्या महिन्यात पथकाने केली आहे. मात्र, त्यानंतर आता निकालाची प्रतीक्षा आहे. महापालिकेने गेल्या वेळी देशात अकरावा क्रमांक पटकावला होता. यंदा टॉप फाइव्हमध्ये येण्यासाठी कसून तयारी केली आहे. त्यामुळे निकालाकडे लक्ष लागून आहे.
----
वनविहार कॉलनीजवळ कचराकुंडी
नाशिक : पारिजात नगरहून वनविहार कॉलनीकडे जाणाऱ्या मार्गावर भोसला आवाराच्या भिंतीलगत रोजच काही नागरिक कचरा टाकत आहेत. त्यामुळे हळूहळू परिसरात कचराकुंडी तयार झाली आहे. महापालिकेने अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
---
कॉसमॉस बँकेजवळ नवीन रस्ता फोडला
नाशिक : महापालिकेच्या वतीने अलीकडेच एमराल्ड पार्कपासून पुन्हा कॅनडा कॉर्नरपर्यंत रस्ता डांबरीकरण करण्यात आले आहे. मात्र, दुसरीकडे गटारीच्या कामासाठी शिरवाडकर उद्यान ते कॉसमॉस बँकेसमोरील रस्ता फोडण्यात आला आहे. त्यामुळे चांगल्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे.