शेतकरी झाले कर्जमुक्त
महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत. जिल्ह्यातील १ लाख १९ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले असून, दोन लाखांपर्यंतचे त्यांचे कर्ज माफ झाले आहे. जिल्ह्यात एक हजार ९१ कोटी ७३ लाख रुपये जिल्हा व राष्ट्रीयकृत बँकांना प्राप्त झाले होते.
११ कोटींचा टंचाई कृती आराखडा
जिल्हयावर वरुण राजाची कृपा बरसल्याने जिल्ह्यात मुबलक पाणीसाठी आहे. त्यामुळे जिल्ह्याला यंदा पाण्याची झळ पोहोचणार नाही, असे आशादायी चित्र असले, तरी मार्च आणि मे महिन्यात जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होत असल्याने, जिल्हा प्रशासनाने ११ कोटी ५५ लाखांचा कृती आराखडा तयार केला आहे.
रोजगार हमी
जिल्ह्यात रोजगार हमीची १३४२ इतकी कामे सुरू आहेत. या कामांवर ५,०५४ इतके मजूर काम करीत आहेत. विशेष म्हणजे, यंदा कोरोनामुळे नोकरी गमावलेले मोठ्या शहरातील गावाकडे परतलेले तरुण हे रोजगार हमीच्या कामावर रुजू झाले आहेत. डिसेंबरमध्ये कामावरील मजुरांची संख्या आणखी वाढली आहे. पेठ, बागलाण आणि कळवण या तालुक्यांमध्ये मजुरांची उपस्थिती सर्वाधिक आहे.