महापालिका : ४५ सुरक्षा रक्षकांची नेमणूक
नाशिक : महापालिकेसमोर होणाºया विविध प्रकारच्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर राजीव गांधी भवन इमारतीत ४५ शस्त्रधारी सुरक्षा रक्षक नेमण्याचा आयुक्तांचा प्रस्ताव बुधवारी (दि.२०) होणाºया महासभेत मान्यतेसाठी ठेवण्यात येणार आहे. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणावर शस्त्रधारी सुरक्षा रक्षक नेमण्यास सभागृहाकडून विरोध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.महापालिका प्रशासनाने राजीव गांधी भवनची सुरक्षा अधिक कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मुंबई येथील महाराष्टÑ स्टेट सिक्युरिटी कार्पोरेशनकडे बंदूकधारी सुरक्षा रक्षक पुरविण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्यानुसार संबंधित महामंडळाकडून सुरक्षा आॅडिटही करण्यात आले. त्यात महामंडळाने राजीव गांधी भवन अन्य ठिकाणी १६ पॉइंटसाठी १३७ सुरक्षा रक्षक पुरविण्याचा प्रस्ताव महापालिकेपुढे ठेवला होता. त्यासाठी येणारा ४ कोटी २७ लाख रुपयांचा वार्षिक खर्चही दर्शविण्यात आला होता. तसेच महामंडळाने बिटको रुग्णालयाचीही पाहणी केली असता, त्याठिकाणी ५१ सुरक्षा रक्षक आवश्यक असल्याचा अहवाल दिला होता. त्यासाठी वेगळा असा १ कोटी ५४ लाख रुपयांचा खर्च दर्शविण्यात आला होता. मात्र, प्रशासनाने तूर्तास राजीव गांधी भवन येथेच ४५ सुरक्षा रक्षक नेमण्याचा प्रस्ताव तयार केला असून, त्यासाठी महापालिकेला वार्षिक १ कोटी ४३ लाख रुपये मोजावे लागणार आहेत. प्रशासनाने गनधारी सुरक्षा रक्षक नेमण्याचा तयार केलेला प्रस्ताव आता बुधवारी होणाºया महासभेत मान्यतेसाठी ठेवण्यात येणार असून, या भरतीला सभागृहाकडून विरोध होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आगावू वेतन मोजावे लागणारमहामंडळाच्या अटीशर्तीनुसार, महापालिकेला सदर सुरक्षा रक्षकांसाठी तीन महिन्यांचे वेतन सुरक्षा अनामत म्हणून ठेवावे लागणार आहे याशिवाय, जीएसटीसह एक महिन्याचे वेतन आगावू मोजावे लागणार आहे. दरात वेळोवेळी वाढ झाल्यास वाढीव दरानेही वेतन अदा करणे भाग पडणार आहे.