नाशिक : नाशिक महानगर परिवहन महामंडळ लिमीला (एनएमपीएमएल) बस सेवा सुरू करण्यासाठी परिवहन मंत्रालयाचा परवाना अखेरीस प्राप्त झाला. त्यामुळे आता प्रवासी भाडे ठरवण्यासाठी आरटीएला प्रस्ताव सादर करण्यात आला आले. प्रवासी भाडे मान्य केल्यानंतर खऱ्या अर्थाने शहर बस वाहतूक कोणत्याही क्षणी सुरू करता येणे शक्य येणार आहे. २०१८ महापालिकेच्या वतीने शहरात बस वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर अनेक कारणांनी ही बस सेवेचा खडतर प्रवास सुरू आहे. ठेकेदाराने बस आणून ठेवल्या आहेत. मात्र, त्या सुरू होऊ शकलेल्या नाहीत. आधी बसस्थानकाची तयारी मग तांत्रिक पूर्तता हे सर्व करताना गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात राज्य शासनाला बस ऑपरेशन सुरू करण्यासाठी परवानाच मिळाला नव्हता. त्यामुळे प्रजासत्ताक दिनी बस सेवेचा शुभारंभ करण्याचे ठरवूनदेखील परवानाच नसल्याने हा मुहूर्त टळला होता. त्यानंतर या विषयावर बरीच चर्चा झाली आणि महापालिकेत भाजपची सत्ता असल्याने राज्यातील शिवसेना सरकार जाणीवपूर्वक परवाना देत नसल्याची टीका सुरू झाली होती. त्यानंतर हा परवाना मंजूर झाल्याचे महापालिकेला कळविण्यात आले असले तरी प्रत्यक्ष परवाना हातात मिळाला नव्हता आता तो प्राप्त झाल्यानंतर गेल्याच आठवड्यात महापालिकेने त्या आधारे प्रादेशिक परिवहन प्राधीकरण म्हणजे आरटीएकडे दर मंजुरीसाठी प्रस्ताव सादर केला आहे. बस चालवण्याचा परवाना मिळाला नसल्याने प्रवासी भाड्याचे दर मंजुरीचा प्रस्ताव आरटीएकडे पाठविता येत नव्हता. आता हा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्याला मान्यता मिळाल्यानंतर कोणत्याही क्षणी महापालिकेची बस सेवा सुरू करता येऊ शकेल.
इन्फो...
महापालिकेच्या प्रस्तावानुसार पहिल्या दोन किलोमीटरसाठी १० रुपये तर अर्धे तिकीट पाच रुपये असणार आहे. २.१ ते ४ किलोमीटरसाठी १५ रुपये, ४.१ ते ६ किलो मीटर अंतरासाठी २० रुपये या प्रमाणे दर असून अखेरच्या टप्प्यात म्हणजेच ४८.१५० किलोमीटर अंतराच्या अखेरच्या टप्प्यासाठी ६५ रुपयांचे तिकीट असेल.