शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
5
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
6
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
7
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
8
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
9
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
10
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
11
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
12
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
13
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
14
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
15
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
17
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
18
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
19
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
20
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

संरक्षणमंत्र्यांकडे मांडणार द्विलेखा पद्धतीचा प्रस्ताव

By admin | Published: June 18, 2016 10:50 PM

एम. देवराजा रेड्डी : रेल्वेकडून महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून अंमलबजावणी

 नाशिक : रेल्वे मंत्रालयाप्रमाणेच संरक्षण मंत्रालयाकडेही द्विलेखा पद्धतीचा प्रस्ताव पुढील महिन्यात मांडणार असून, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू हे स्वत: सनदीलेखापाल असल्यामुळे त्यांनी अजमेर व कपूरथळा या स्थानकांवर द्विलेखा पद्धतीचा अवलंब एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून हाती घेतला आहे, अशी माहिती द इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाउंटंट आॅफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष एम. देवराजा रेड्डी यांनी दिली.सीए इन्स्टिट्यूटच्या नाशिक शाखेने प्रथमच आयोजित केलेल्या राष्ट्रीय प्रत्यक्ष कर परिषदेचे उद््घाटक म्हणून उपस्थित असलेले रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत इन्स्टिट्यूटकडून अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी केले जाणारे विविध प्रयत्न याविषयी त्यांनी संवाद साधला. यावेळी रेड्डी यांनी रेल्वे मंत्रालयाकडून राबविल्या जाणाऱ्या द्विलेखा पद्धतीच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाविषयी माहिती दिली. यावेळी ते म्हणाले, रेल्वेच्या अंदाजपत्रकात वापरात नसलेल्या मालमत्तांचा विचारच केला जात नाही. त्यामुळे खर्चाचे असंतुलन प्रकर्षाने जाणवते. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू हे स्वत: सनदीलेखापाल असल्याने त्यांनी द्विलेखा पद्धतीचा तत्काळ विचार करत अजमेर, कपूरथळा या स्थानकांवर महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून हाती घेतला आहे. येत्या १ जुलै रोजी दिल्ली येथे सीए भवनमध्ये होणाऱ्या सनदीलेखापाल दिनाच्या सोहळ्याप्रसंगी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर हे उपस्थित राहणार असून, त्यांच्यापुढेही द्विलेखा पद्धतीचा प्रस्ताव सादर केला जाणार आहे, असे ते म्हणाले. याप्रसंगी प्रफुल्ल छाजेड, नवीन गुप्ता, धीरज खंडेलवाल, नाशिक शाखेचे अध्यक्ष रवि राठी, मंगेश किनारे उपस्थित होते.