शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
3
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
4
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
5
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
6
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
7
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
8
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
9
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
10
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
11
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
12
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
13
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
14
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
15
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
16
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
17
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
18
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
19
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
20
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप

भूसंपादनाचे प्रस्ताव स्थायीने फेटाळले

By admin | Published: January 08, 2015 12:31 AM

सदस्य संतप्त : प्रभागांमधील किरकोळ कामेही होत नसल्याच्या तक्रारी; प्रशासनाचे वेधले लक्ष

नाशिक : नगरसेवकांच्या प्रभागांतील किरकोळ कामांसाठी महापालिकेकडे निधी नाही आणि सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नावाखाली विविध आरक्षणांसाठी भूसंपादनाचे कोट्यवधी रुपयांचे प्रस्ताव स्थायी समितीवर मंजुरीसाठी ठेवले जात असल्याबद्दल समिती सदस्यांनी बैठकीत आक्रमक भूमिका घेतली. यावेळी हॉस्पिटलसारख्या अत्यावश्यक आरक्षणासाठीचे भूसंपादन वगळता समितीने सुमारे ७७ कोटी रुपयांचे भूसंपादनाचे प्रस्ताव फेटाळून लावले. महापालिकेत कामांच्या फाईलींचा प्रवास लांबत चालल्याबद्दलही सदस्यांनी नाराजीचा सूर लावला. महापालिका स्थायी समितीच्या सभेत विविध आरक्षणांसह सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त करावयाच्या कामांसाठीचे भूसंपादनाचे प्रस्ताव प्रशासनाने मान्यतेसाठी ठेवले होते. या प्रस्तावाला सर्वच सदस्यांनी तीव्र विरोध दर्शविला. राहुल दिवे यांनी या प्रस्तावांमधील निम्म्याहून अधिक प्रस्ताव हे तातडीचे नाहीत. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नावाखाली भूसंपादनाचे विषय आणून बिल्डरांना संरक्षण दिले जात असल्याचा आरोपही दिवे यांनी केला. शीतल भामरे यांनी कुंभमेळ्याच्या नावाखाली अन्य विकासकामे थांबवून शहराला वेठीस धरण्याचा प्रयत्न केला जात असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. प्रा. कुणाल वाघ यांनीही प्रभागांमध्ये कामे होत नसल्याचे सांगत प्रशासनाच्या उदासीन भूमिकेकडे लक्ष वेधले. सचिन मराठे यांनी महापालिकेकडे किरकोळ कामांसाठी निधी उपलब्ध नसल्याचे सांगतात आणि भूसंपादनासाठी एवढे कोट्यवधी रुपये कोठून आणणार, असा सवाल उपस्थित केला. वंदना बिरारी, रंजना भानसी, अर्चना थोरात, सविता काळे या सदस्यांनीही भूसंपादनाच्या प्रस्तावांना कडाडून विरोध दर्शवित आधी प्रभागातील कामांना प्राधान्य देण्याची सूचना केली. यावेळी सभापतींनी अत्यावश्यक कामांसाठीचे भूसंपादन वगळता उर्वरित सर्व भूसंपादनाचे प्रस्ताव फेटाळून लावले आणि सदस्यांच्या कामांना प्राधान्य देण्याचे आदेश प्रशासनाला दिले. (प्रतिनिधी)