नाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गातून सुपीक जमिनी वगळा यासह विविध मागण्यांसाठी ‘समृद्धी’बाधित शेतकरी काळी दिवाळी साजरी करणार असून, त्यासाठी दिवाळीत काळे आकाशकंदील लावण्याचा निर्णय समृद्धीबाधित शेतकºयांनी घेतला आहे.शेतकरी संघर्ष समितीची नाशिक जिल्ह्णाची बैठक सोमवारी होऊन त्यात समितीचे अध्यक्ष राजू देसले यांनी दहा जिल्ह्णांतील समृद्धीबाधित आंदोलनाची तसेच न्यायालयीन खटल्याची माहिती यावेळी दिली. त्यानंतर काही निर्णय घेण्यात आले. त्यात प्रामुख्याने समृद्धीबाधित शेतकºयांची जमीन भूसंपादन कायद्याप्रमाणे संपादन करावी, एक प्रकल्प एक दर द्या, पिकाऊ व बागायती जमीन महामार्गातून वगळा, सिन्नर तालुक्यातील गोंदे गावाचा दर जाहीर करा, या मागण्या करण्यात आल्या. सरकारचा निषेध म्हणूून काळी दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस कचरू पाटील, रावसाहेब हारक, संतोष ढमाले, नीलेश गुंजाळ, शांताराम ढोकणे आदी उपस्थित होते. न्यायालयीन लढ्याबाबत दिवाळीनंतर राज्यस्तरीय बैठकीत निर्णय घेण्यात आला.
‘समृद्धी’बाधितांची ‘काळी दिवाळी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 12:22 AM