नाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी गेल्या दीड वर्षापासून थेट जागा खरेदीची तयारी सुरू असतानाही खरीप व रब्बी हंगामाची पिके घेणाऱ्या जिल्ह्यातील समृद्धीबाधित शेतकºयांना यंदापासून दोन्ही हंगामाला मुकावे लागणार आहे. महाराष्टÑ रस्ते विकास महामंडळाच्या ताब्यात ९० टक्के जागा मिळाल्यामुळे दिवाळीनंतर काम सुरू करण्यासाठी ठेकेदाराकडे जागा हस्तांतरण करण्याची तयारी सुरू झाल्याने शेतकºयांना रब्बीच्या पेरणीपासून रोखण्यात येणार आहे.नाशिक जिल्ह्यातील सिन्नर व इगतपुरी या दोन तालुक्यांतील ४९ गावांमधून मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग जाणार असल्याने महामार्गासाठी शेतकºयांकडून पाच पट दराने थेट जमिनीची खरेदी गेल्या दीड वर्षापासून केली जात आहे. प्रारंभी महामार्गाला व जागा देण्यास विरोध करणाºया शेतकºयांनी कालांतराने जमीन विक्रीची संमती दिल्यामुळे महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडे नाशिक जिल्ह्यातील सुमारे ९० टक्के जागा ताब्यात मिळाली आहे. उर्वरित जागा ताब्यात घेण्यासाठी सक्तीने भूसंपादन करण्याच्या नोटिसा दहा टक्के शेतकºयांना धाडण्यात आल्या आहेत. ज्या शेतकºयांनी स्वखुशीने जागा दिली त्या जागेची मोजणी करून त्यांना मोबदला अदा करण्यात आला असला तरी, त्या शेतजमिनीचा ताबा अप्रत्यक्ष शेतकºयांकडेच असल्यामुळे त्यांनी गेल्या वर्षी खरीप व रब्बी हंगामाची पिके घेतली. हे करीत असताना महामार्गासाठी करण्यात आलेल्या संयुक्त मोजणीसाठी शेतजमिनीवर करण्यात आलेल्या खुणादेखील त्यांनी नष्ट करून टाकल्या आहेत. आता मात्र दिवाळीनंतर सरकारने प्रत्यक्ष या कामाची सुरुवात करण्याचे जाहीर करून त्यासाठी ठेकेदारही निश्चित केले आहे. नाशिक जिल्ह्णात तीन ठेकेदारांकरवी हे काम केले जाणार आहे. त्यात पाथरे ते सोनारी, सोनांबे ते तारांगणपाडा व तारांगणपाडा ते ठाणे अशा तीन टप्प्यांचा समावेश आहे. दिवाळीनंतर ठेकेदाराकडून कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याने शेतकºयांना नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये रब्बीची पेरणी करता येणार नसून, तशा सूचना शेतकºयांना देण्यात आल्या आहेत.ताब्यात असलेल्या जमिनींचे लवकरच हस्तांतरणगेल्या आठवड्यातच ठेकेदाराच्या पथकाने जमिनीची पाहणी केली असून, सध्या रस्ते महामंडळाच्या ताब्यात असलेल्या जमिनीचे लवकरच ठेकेदाराकडे हस्तांतरण करण्यात येणार आहे. त्यासाठी पुन्हा एकदा जमिनीची प्रत्यक्ष जागेवर जाऊन मोजणी करण्यात होणार आहे.
समृद्धीबाधित रब्बी हंगामाला मुकणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 1:18 AM
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी गेल्या दीड वर्षापासून थेट जागा खरेदीची तयारी सुरू असतानाही खरीप व रब्बी हंगामाची पिके घेणाऱ्या जिल्ह्यातील समृद्धीबाधित शेतकºयांना यंदापासून दोन्ही हंगामाला मुकावे लागणार आहे.
ठळक मुद्देदिवाळीनंतर जागा हस्तांतरण काम सुरू करण्याची घाई