नाशिक : देहविक्री करणाऱ्या महिलांचे पुनर्वसन करून त्यांच्या रोजगारासाठी प्रवरा मेडीकल ट्रस्ट आणि नाशिक लेडीज सर्कल ११९ यांच्या सहकार्याने क्रिमसन प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याक येत आहे. याचाच एक भाग म्हणून नाशिकमध्ये किस्मत बाग येथे अशा महिलांसाठी सॅनिटरी पॅड निर्मिती केंद्राची सुरुवात करण्यात आली आहे. या केंद्राच्या माध्यमातून ५ महिलांचे प्रशिक्षण करण्यात आले असून त्यांना सॅनिटरी पॅड निर्मितीसाठी आवश्यक साहित्यही उपलब्ध करून देण्यात आले.
नाशिक लेडीज सर्कल ११९ तर्फे प्रवरा मेडिकल ट्रस्ट द्वारा राबविण्यात येणाऱ्या क्रिमसन प्रकल्पाच्या माध्मातून सॅनिटरी पॅडचे उत्पादन करण्यात येणार आहे. त्या साठी लागणारी सॅनिटरी पॅड बनवण्याची मशीन व सुमारे २५ हजार रुपयांचे साहित्यही उपलब्ध करून देण्यात आले आहे. या महिला सॅनिटरी पॅड ची निर्मिती करून रोजगार मिळविण्याच्या दृष्टीने सक्षम होऊन स्वावलंबी होण्यासाठी या प्रकल्पाच्या माध्यमातून गुरुवारी (दि.२४) व शुक्रवारी (दि.२५) ५ महिलांचे प्रशिक्षण संस्थेमध्ये करण्यात आले असून शनिवारी (दि.२६) या प्रकल्पाचे आमदार सीमा हिरे यांच्या हस्ते उद्घटना करण्यात आले. हा प्रकल्प प्रवराच्या नाशिकमधील कार्यालयात राबवण्यात येणार असून प्रकल्पासाठी लेडीज सर्कल ११९ अध्यक्ष डॉ. शीतल सेठी, प्रत्यशा चौहान सचीव स्नेहा जोहोरी यांच्यासह फरहीन राणा, निश्रीन काचवला, मेघा राठी व प्रवरा मेडिकल ट्रस्ट च्या समन्वयक आसावरी देशपांडे, संतोष काळे, कुलदीप पवार, संदीप चांद्रमोरे, सोईफ सैयद, सचिन काळे, सुरेखा खैरनार यांच्यासह तसेच दिशा महिला संघटने तर्फे नूरजहाँ शेख व आकाश अहिरे उपस्थित होते. दरम्यान, या महिलांना गिव्ह संस्थेतर्फे ५ हजार पॅड निर्मितीची पहिली ऑर्डरही मिळाली असून दरमहा पाचशे पॅडची ऑर्डरही या महिलांना मिळाली. त्यामुळे केंद्राच्या उद्घघाटनापासून लगेचच पॅड निर्मितीचे काम सुरू होणार असून या पाचही महिला स्वावलंबनाच्या मार्गावर मार्गस्त होऊ शकणार आहे.