एका वाहिनीवर रात्री ८.३० वाजेच्या सुमारास नियमित प्रसारित होणाऱ्या ‘अग्गबाई सूनबाई’ या मालिकेत दि.२० मे रोजीच्या कथानकात नायकाने शिलाई मशीनला लाथ मारण्याचा प्रसंग दाखविण्यात आला होता. शिलाई मशीन हे शिंपी समाजाचे पूर्वापर चालत आलेले उदरनिर्वाहाचे साधन आहे. मालिकेत दर्शविण्यात आलेल्या प्रसंगामुळे शिंपी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. मालिकेतील सदर दृश्य वगळण्यात यावे, तसेच मालिकेच्या लेखिका शुभदा आयरे, शेखर धवलीकर, निर्माता सुनील भोसले, अभिनेता अद्वैत दादरकर आणि दिग्दर्शकासह सदर वाहिनीने शिंपी समाजाची जाहीर माफी मागावी, अन्यथा शिंपी समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी व माहिती प्रसारण अधिकारी यांना देण्यात आले आहे.
याप्रसंगी अखिल भारतीय शिंपी समाजाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अरुण नेवासकर, उत्तर महाराष्ट्र प्रमुख दत्ता वावधाने, जिल्हाध्यक्ष प्रवीण पवार, विंचूर शहराध्यक्ष किरण नवले, ज्येष्ठ नेते शरदराव महाजन, बाळकृष्ण कल्याणकर, ज्ञानदेव कल्याणकर, विजय क्षीरसागर, विजय झनकर, अनिल क्षीरसागर, अरुण कल्याणकर, गोविंद कल्याणकर आदी उपस्थित होते.
२४ विंचूर शिंपी
शिंपी समाजाच्या वतीने बैठक होऊन ‘अग्ग बाई सूनबाई’ या मालिकेतील दृश्याचा निषेध करण्यात आला. त्याप्रसंगी उपस्थित पदाधिकारी.
===Photopath===
240521\24nsk_10_24052021_13.jpg
===Caption===
२४ विंचूर शिंपीशिंपी समाजाच्यावतीने बैठक होऊन अग्ग बाई सुनबाई या मालिकेतील दृश्याचा निषेध करण्यात आला. त्याप्रसंगी उपस्थित पदाधिकारी.