येवला : नगरसूल ग्रामीण रुग्णालय येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांना शिवीगाळ करून दगडफेक करत झालेल्या हल्ल्याचा आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी- कर्मचाऱ्यांनी निषेध नोंदवून सुरक्षेची मागणी एका निवेदनाद्वारे केली आहे. प्रांताधिकारी सोपान कासार, तहसीलदार रोहिदास वारुळे यांच्यासह संबंधिताना सदर निवेदन देण्यात आले.नगरसूल येथे डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये ६२ वर्षीय बाधित वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही महिला मधुमेह, उच्च रक्तदाब व हृदयविकाराने ग्रस्त होती. तसेच त्यांची अॅन्जिओप्लास्टी झालेली होती. महिलेवर आयसीएमआरच्या नियमानुसार योग्यपद्धतीने उपचार सुरू होते; परंतु तिला श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने वैद्यकीय अधिकाºयांनी आॅक्सिजनसह सर्व इर्मजन्सी औषधोपचार तातडीने केले. मात्र दुर्दैवाने उपचारादरम्यान महिला दगावली.निवेदनावर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हितेंद्र गायकवाड, शरद कातकडे, आनंद तारू, हनुमंत पळवे, सायली जंगम, किरण खांडेकर, प्रिया अहिरे, अभिजित देशमुख, अक्षय क्षात्रपुरे, मिलिंद पारिक, केशव भामरे, एस.बी. पैठणकर, एस.ए. गांगुर्डे, जी.एन. मढवई, एस.बी. कोथमिरे आदींच्या स्वाक्षºया आहेत.--------------संघटनेतर्फे प्रांताधिकाºयांना निवेदनमृत महिलेच्या नातेवाइकांनी डीसीएचसी आवारात जमाव गोळा करून डॉक्टरांना शिवीगाळ करत डॉक्टरांवर प्राणघातक दगडफेक केली. हल्ल्यात वैद्यकीय अधिकारी डॉ. मदनुरे, तारू, तालुका वैद्यकीय अधिकारी गायकवाड हे थोडक्यात बचावल्याचे निवेदनात म्हटले आहे.
डॉक्टरांवरील हल्ल्याचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 9:57 PM