संघटनेने याबाबत म्हटले आहे, वृत्तपत्राच्या वितरणाला शासनाने अत्यावश्यक सेवा म्हणून घोषित केले आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या वृत्तपत्रांच्या घरोघरी वितरणासाठी विक्रेते सेवा देत असतात. त्यांना अवमानकारक वागणूक देत मारहाण करण्याची घटना निंदनीय व निषेधार्ह आहे. याठिकाणी पोलिसांना अधिकार नसतानाही त्यांच्याकडून दंड वसुली करण्यात आलेली आहे. एकीकडे पोलिसांकडे सर्व समाज कोरोनायोद्धा म्हणून पाहत असताना पोलिसांकडून अशाप्रकारचे होणारे वर्तन त्यांच्या प्रतिमेला धक्का देणारे आहे. सदर मारहाणीच्या घटनेतील पोलिसांवर निलंबनाची कारवाई करावी व जखमी वृत्तपत्र विक्रेत्यांचा रुग्णालयाचा खर्च व त्यांचे झालेले नुकसान याची भरपाई करण्याची मागणी संघटनेचे अध्यक्ष संजय जगताप, उपाध्यक्ष पापन्ना यादव, रवींद्र कुलकर्णी, अशोक नागमोती, संतोष शर्मा, भूषण अलई, वाल्मीक पगारे, संजय तरवटे, दिनेश जाधव, देवेंद्र नागमोती, संजय आहिरे, दगडू बोरकर, मधू यादव, गजानन यादव, नंदू यादव, राजू यादव, रामा यादव, अमोल धामणे, गिरीश धामणे, अनिल महाजन, दत्ता यादव, दीपक यादव, मुन्ना शर्मा, अनिल देशपांडे आदींनी केली आहे.
जळगाव येथील वृत्तपत्र विक्रेत्यांना मारहाणीचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 4:12 AM