‘त्या’ क्रूर अमानवी कृत्याचा ४८ चौ.फूटाच्या रांगोळीद्वारे निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 12:34 PM2020-06-05T12:34:52+5:302020-06-05T12:37:04+5:30

हत्तीणीचे चित्र रेखाटून ‘एका मुक्या आईच्या आक्रोशाचा न्याय जेव्हा निसर्ग करेल, तेव्हा तुमच्या गर्वाची, नीचपणाची मस्ती जिरवल्याशिवाय राहणार नाही...’ असा संतापजनक संदेशही रांगोळीद्वारे दिला

Protest against 'that' cruel inhuman act with 48 sq. Ft. Rangoli | ‘त्या’ क्रूर अमानवी कृत्याचा ४८ चौ.फूटाच्या रांगोळीद्वारे निषेध

‘त्या’ क्रूर अमानवी कृत्याचा ४८ चौ.फूटाच्या रांगोळीद्वारे निषेध

Next
ठळक मुद्दे६ फूट रूंद व ८फूट लांबीची रांगोळी सहा तास अविरत परिश्रम

नाशिक : केरळमधील एका गर्भवती हत्तीणीला काही क्रूर मानवांनी फटाक्यांनी भरलेला अननस खाऊ घातला अन् तीने एक दोन नव्हे तर चार दिवस मरणयातना पाण्याच्या तलावात उभे राहून भोगल्या अन् अखेर मृत्यूला कवटाळले. या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेने अवघा देश थरथरला. सोशलमिडियावर नेते, अभिनेत्यांपासून सर्वसामान्यांनी या घटनेचा निषेध व्यक्त करत तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला. अशाच पध्दतीने नाशिकची युवा रांगोळीकार पुजा बेलोकर व तिच्या सहकाऱ्यांनी सहा तास अविरत परिश्रम घेत ६ फूट रूंद व ८फूट लांबीची रांगोळी रेखाटून अमानवी कृत्याचा निषेध नोंदविला.
नाशिकमधील रविवार कारंजा येथील लोणार गल्लीत पुजा, ओमकार टिळे यांनी या क्रूर घटनेकडे आपल्या रांगोळीच्या कलेद्वारे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. हत्तीणीचे चित्र रेखाटून ‘एका मुक्या आईच्या आक्रोशाचा न्याय जेव्हा निसर्ग करेल, तेव्हा तुमच्या गर्वाची, नीचपणाची मस्ती जिरवल्याशिवाय राहणार नाही...’ असा संतापजनक संदेशही रांगोळीद्वारे दिला आहे. ४८ चौरस फूटाची रांगोळी काढण्यासाठी पुजा आणि ओमकारला सुमारे सहा तासांचा वेळ लागला. या रांगोळीचे शिर्षक त्यांनी ‘अमानवी घटना’ असे दिले आहे.
केरळमध्ये हत्तीणीचा अशा पध्दतीने ‘खून’ करण्यात आला. पर्यावरण दिनाच्या तोंडावर ही संतापजनक क्रूर घटना समोर आली आणि अवघा देश हादरला. सोशलमिडिया गहिवरून आला. सर्वच क्षेत्रांमधून या घटनेचा अत्यंत तीव्र अशा शब्दांत निषेध नोंदविला गेला. सर्वांनी या क्रूरतेला माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य म्हटले. ज्यांनी हे कृत्य केले त्यांना भारतीय वन्यजीव संवर्धन कायद्यानुसार कठोर शिक्षा व्हावी, अशी जोरदार मागणी सर्वच स्तरांमधून पुढे आली. केवळ पर्यावरणप्रेमी, निसर्ग व वन्यजीवप्रेमी नव्हेच तर प्रत्येक संवेदनशील मन या घटनेने हळहळले. ज्या निसर्गाने केरळला भरभरून दिले, त्या राज्यातील एका गावात अशी घटना घडणे हे अत्यंत दुर्दैवी असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.

Web Title: Protest against 'that' cruel inhuman act with 48 sq. Ft. Rangoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.