निफाड : केंद्र सरकारने पेट्रोल,डिझेल आणि घरगुती गॅसच्या किमतीत भरमसाठ वाढ केल्याने सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहे. या इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी युवा सेनेच्या वतीने रविवारी (दि.३) शांतीनगर त्रिफुलीवर थाळ्या वाजवा आंदोलन करण्यात आले.या थाळ्य़ा वाजवा आंदोलनात युवा सैनिकांनी जोरजोरात थाळ्या वाजविल्या व घोषणा देत इंधन दरवाढीचा निषेध केला. या थाळ्या वाजवा आंदोलनात युवासेनेचे जिल्हाप्रमुख विक्रम रंधवे, शिवसेनेचे तालुका प्रमुख सुधीर कराड, युवासेनेचे तालुकाप्रमुख आशिष शिंदे, संजय धारराव, युवा सेनेचे शहरप्रमुख प्रतीक बाफना, अभिजित चोरडिया, नाना कर्डिले, निखिल व्यवहारे, मोहन जाधव, अरुण व्यवहारे, समाधान कुंभार्डे, किशोर जावरे, सर्वंकष भोसले, अमर परदेशी, साजन ढोमसे, प्रशांत राऊत, सौरभ कापसे प्रशांत गायकवाड, रवी पवार, राहुल रंधवे , यशवंत वाघ, कृष्णा चव्हाण, सिद्धेश कर्डिले, गौरव राऊत आदींसह युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.निफाड येथे थाळ्य़ा वाजवून केंद्र सरकारचा निषेध करताना विक्रम रंधवे, सुधीर कराड, आशिष शिंदे, संजय धारराव, अभिजित चोरडिया, प्रतीक बाफना, नाना कर्डिले, निखिल व्यवहारे, समाधान कुंभार्डे, किशोर जावरे आदी.
युवा सेनेकडून थाळ्या वाजवून इंधन दरवाढीचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2022 12:45 AM
निफाड : केंद्र सरकारने पेट्रोल,डिझेल आणि घरगुती गॅसच्या किमतीत भरमसाठ वाढ केल्याने सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहे. या इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी युवा सेनेच्या वतीने रविवारी (दि.३) शांतीनगर त्रिफुलीवर थाळ्या वाजवा आंदोलन करण्यात आले.
ठळक मुद्देजोरजोरात थाळ्या वाजविल्या व घोषणा देत इंधन दरवाढीचा निषेध केला.