सिन्नर: नागपुर कामठी येथील सलुन व्यावसायिकावर वार करुन निघृन खून केल्याची घटना घडल्याने राष्ट्रीय नाभिक एकता महासंघ नाशिक जिल्हा व सिन्नर तालुका आणि सलून असोसिएशन, नाभिक युवासेना आदींच्या वतीने या घटनेचा निषेध व्यक्त करत संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी तहसिलदार राहूल कोताडे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.नागपूर कामठी येथील सलून व्यवसायीक सुदेश हंसराज फुले यांच्यावर अज्ञात इसमांनी धारदार शस्त्राने वार करुन अमानुषपणे हत्या केली. पोलीस यंत्रणेने या खूनाचा शोध ताबडतोब लावून आरोपींना फाशीची शिक्षा दयावी. तसेच मयत सुदेश फुले हे कुटुंबातील एकमेव कमावती व्यक्ती होती. त्यामूळे त्यांचे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती गरिबीची व हालाखीची असल्याने कुटुंबियास शासना मार्फत भरघोस आर्थिक मदत मिळावी. सदरचा खटला जलद गती न्यायालयात चालवावा व लवकर निकाल लावून आरोपींना शिक्षा मिळावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.यावेळी नाभिक एकता महासंघाचे विभागीय समन्वयक केशव बिडवे, जिल्हाध्यक्ष रमेश बिडवे, उपाध्यक्ष महेंद्र कानडी, सिन्नर तालुकाध्यक्ष राजेंद्र बिडवे, जिल्हा सहसंपर्कप्रमुख बाळासाहेब साळुंके, तालुका उपाध्यक्ष अमोल शिंदे, दत्ता पंडीत, सचिव किरण बिडवे, सलून असोसिएशन प्रसिद्धी प्रमुख युवराज शिंदे, सहसंघटक उत्तम कडवे, युवासेना शहर अध्यक्ष केशव पंडित, सलून असोसिएशन तालुका उपाध्यक्ष राजेंद्र तूपे, शंतनु कानडे आदींसह समाज बांधव उपस्थित होते.
सलुन व्यावसायिकाच्या हत्येचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 2:29 PM
सिन्नर: नागपुर कामठी येथील सलुन व्यावसायिकावर वार करुन निघृन खून केल्याची घटना घडल्याने राष्ट्रीय नाभिक एकता महासंघ नाशिक जिल्हा व सिन्नर तालुका आणि सलून असोसिएशन, नाभिक युवासेना आदींच्या वतीने या घटनेचा निषेध व्यक्त करत संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी तहसिलदार राहूल कोताडे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
ठळक मुद्देसिन्नर: राष्ट्रीय नाभिक एकता महासंघाच्या तहसीलदारांना निवेदन