मालेगाव : पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या निषेधार्थ शहरातील भाजप कार्यकर्त्यांतर्फे निदर्शने करण्यात आली.
मालेगाव शहर तसेच मालेगाव ग्रामीण, सटाणा व बगलाण येथील भाजप कार्यालयाच्या बाहेर फलक हातात घेऊन निषेध नोंदविण्यात आला. कोरोनाच्या नियमांचे पालन व्हावे व निदर्शनेही व्हावी, या उद्देशाने प्रत्येक भाजप पदाधिकारी व सदस्य यांनी आपापल्या घराबाहेर निषेधाचे फलक हातात घेऊन निषेध नोंदवला. याविषयीच्या पत्रकात म्हटले आहे की, पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर त्या राज्यात सुडाचे राजकारण चालू झाले आहे. ठिकठिकाणी भाजप कार्यकर्त्यांवर तृणमूल काँग्रेसचे गुंड हल्ले करत आहेत. भाजप कार्यकर्त्यांचे खून करणे, त्यांच्या घरांची जाळपोळ करणे, त्यांच्या दुकानांना किंवा व्यवसायाच्या ठिकाणाला आगी लावणे, असे प्रकार घडत आहेत. ही लोकशाहीची हत्या आहे. त्याच्या निषेधार्थ भाजपचे कार्यकर्ते कोरोनाचे नियम पाळून आंदोलन करत आहोत, असे जिल्हाध्यक्ष सुरेश निकम यांनी सांगितले.
यावेळी सुरेश निकम, देवा पाटील, हरिप्रसाद गुप्ता, सुधीर जाधव, नंदू तात्या सोयगावकर, रविश मारू, सुनील शेलार, पप्पू पाटील, भूषण शिंदे, आदी उपस्थित होते.