येवला : दोंडाईचा येथील बालिका अत्याचाराच्या निषेधार्थ येवला शहर व तालुक्यातील येथील तेली समाजाने निषेध मोर्चा काढला. या घटनेतील आरोपीला कडक शासन व्हावे, या मागणीसाठी येवला शहर पोलीस निरीक्षक व तहसीलदारांंना निवेदन देण्यात आले. शहर पोलीस निरीक्षक संजय पाटील, तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांनी निवेदन स्वीकारले. नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, भाजपा शहराध्यक्ष आनंद शिंदे, तैलिक महासंघाचे अध्यक्ष सदानंद बागुल, तैलिक संघ युवक अध्यक्ष योगेश सोनवणे यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. शुक्र वारी दुपारी साडेबारा वाजता शहरातील संताजी मंगल कार्याल-या पासून मूकमोर्चा काढण्यात आला. मोर्चा थेट येवला शहर पोलीस ठाण्यात आल्यावर नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर यांनी आपल्या भाषणात घटनेचा निषेध नोंदवला. मोर्चात नाना महाराज घोगते, जगन्नाथ रायजादे, संतोष मोरे, किरण घाटकर, बापू गाडेकर, रामदास रायजादे, छाया क्षीरसागर, सविता साळुंके, सुनंदा सोनवणे, प्रा.कैलास चौधरी, सुभाष मगर, कृष्णा क्षीरसागर, रंगनाथ लुटे, नितीश घाटकर, अर्जुन धारक, दिलीप दिवटे, रमेश महाले, विजय मोरे, अशोक सोमवंशी, शांताबाई काळे, अलका गांगुर्डे, गोपिका लगड, हौशाबाई रायजादे, श्याम मगर, गीता सूर्यवंशी, कादंबरी सोनवणे, प्रकाश साळुंके, वरद साळुंके, सुभाष सोनवणे, सचिन जाधव, दत्ता महाले, अशोक मगर यांच्यासह तेली समाजबांधव मूकमोर्चात सहभागी झाले होते. आनंद शिंदे यांनी आपल्या भाषणात मानवतेला काळिमा फासणाºया घटनेचे समर्थन करणाºया व आरोपींना पाठीशी घालणाºया समाजकंटकाचा शोध घेऊन गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. पीडित कुटुंबाला शासनाने आर्थिक साहाय्य करावे, अशी मागणी केली.