नांदगाव : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकांच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष हरेश्वर सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आंदोलन केल्यानंतर तहसील प्रशासनास निवेदन देण्यात आले. अव्वल कारकून संतोष डुंबरे यांनी निवेदन स्वीकारले.रविवारी (दि. २०) शेतकरी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य विधेयक, शेतकरी मूल्य आश्वासन आणि कृषिसेवा विधेयक भाजप सरकारने बहुमताच्या जोरावर मंजूर करून घेतले आहे. या विधेयकामुळे देशी-विदेशी कंपन्या शेती व्यवसायात उतरतील व कृषी उत्पन्न बाजार समितीचे अस्तित्व धोक्यात येऊन हजारो लोक बेरोजगार होतील. साठेबाजारावर अंकुश राहणार नाही. शेतमालाच्या किमती अस्थिर होतील. अन्नधान्यावरील स्वावलंबन संपून कंपन्यांच्या हातात निर्णय जातील. शेतकºयाला बाहेर कुठेही शेतमाल विकल्यास मिळणारे मूल्य हे किमान आधारभूत मूल्यापेक्षा कमी नसावे, अशी तरतूद विधेयकात नाही व ठेकेदारी तत्त्वावर शेती केल्यावर त्यात जर कुठला वाद निर्माण झाला तर तो दिवाणी न्यायालयाच्या कक्षेबाहेर राहील. अत्यावश्यक वस्तू कायद्यातील दुरु स्तीमुळे व्यापारीवर्ग गरजेपेक्षाही जास्त प्रमाणात मालाचा साठा करू शकतात त्यासाठी त्यांना कुठल्याही शिक्षेची तरतूद नाही यायावेळी दर्शन आहेर, कैलास गायकवाड, उदय पाटील, पुंडलिक सदगीर, जितेंद्र देशमुख, शब्बीर शेख, योगेश वाघ, किरण जाधव, रोशन आहेर, किशोर वाघ, नारायण सदगीर, एकनाथ बोराडे, निरंजन आहेर, सागर जाधव, अक्षय कासलीवाल, प्रवीण घोटेकर, ज्ञानेश्वर अहिरे, सागर साळुंके आदी उपस्थित होते. भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनोज चोपडे, शहर प्रमुख सोनू पेवाल यांनी आंदोलनात सहभाग नोंदवूनपाठिंबा दर्शविला.विधेयक रद्दची मागणीसाठेबाजीमुळे सामान्य नागरिकांना महागाईची झळ पोहोचेल तसेच केंद्र सरकारला शेतकऱ्यांची इतकी काळजी आहे तर त्यांनी किमान आधारभूत किंमत किवा हमीभाव यापेक्षा कमी दराने कृषीमाल खरेदी करणे गुन्हा का ठरवत नाही. हे विधेयक म्हणजे शेतकºयांचे मृत्यूचे फर्मान आहे हे रद्द न झाल्यास नांदगाव तालुका युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनात दिला आहे.
नव्या कृषी विधेयकांच्या निषेधार्थ धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 1:27 AM
केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकांच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष हरेश्वर सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आंदोलन केल्यानंतर तहसील प्रशासनास निवेदन देण्यात आले. अव्वल कारकून संतोष डुंबरे यांनी निवेदन स्वीकारले.
ठळक मुद्देनांदगाव : कॉँग्रेसतर्फे तहसील प्रशासनास निवेदन