शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

मराठा समाजाचे राज्य शासनाविरोधात कसाऱ्यात निषेध आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2023 1:08 PM

सकल मराठा समाजाच्या निषेध मोर्चामध्ये मराठा समाजाला पाठींबा देण्यासाठी इतर जाती-धर्माचे नागरिकही सहभागी झाले.

शाम धुमाळ, कसारा: जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी  येथील मराठा समजाच्या आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलकांवर शासनाच्या आदेशानुसार पोलिसांनी लाठीमार केल्याच्या घटनेचा निषेध म्हणून राज्यशासनाचा निषेध करण्यासाठी कसारा शहरातील सकल मराठा समाजाच्या वतीने शहरात आज रविवारी  (ता.3) निषेध मोर्चा काढण्यात आला.

आज सकाळी सकल मराठा समाजाच्या निषेध मोर्चामध्ये मराठा समाजाला पाठींबा देण्यासाठी इतर जाती-धर्माचे नागरिकही सहभागी झाले.रविवारी सकाळी १० वाजता शहरातील  छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून मोर्चास सुरुवात झाली. मराठा समाजाच्या महिलाही मोठ्या प्रमाणात मोर्चात सहभागी झाल्या.

सकाळी 10 वाजता निघालेल्या या निषेध मोर्चाचे नेतृत्व  मराठा समाजाचे रघुनाथ कदम,विजय शिंदे,शिवाजी भोसले,  माधुरी आयरे,सुधीर चौधरी, अमोल बांदेकर,शंकर भगत,महेंद्र शिंदे यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज चौकात . मराठा आंदोलकांवर केलेल्या हल्याचा निषेध करून यापुढे अशा प्रकारचे हल्ले खपवून घेणार नाही जर राज्य सरकार मराठा समाजा बाबत एवढे निष्ठूर वागत असेल तर या पुढे शांततेत होत असलेले आंदोलन वेगळ्या पद्धतीने होतील असा इशारा या वेळी मराठा समाजाच्या स्थानिक नेत्यांनी राज्यशासनास दिला दरम्यान पोलीस हे मराठा समाजाचे शत्रू नाहीत परंतु  ज्यावेळी राज्य शासनाचा प्रतिनिधी पोलिसांना लाढीचार्ज ,गोळीबार चे आदेश  देतो त्याच वेळी  पोलीस अशी भूमिका घेतात त्यामुळे आमचा लढा हा पोलिसा विरोधात नाही तर शासना विरोधात असल्याचे यावेळी मोर्चेकरांनी स्पष्ट केले. मराठा समाजाला बदनाम करण्याचा कट थांबवा...

दरम्यान जालना मधील पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीचार्ज दरम्यान चेंगरा चेंगरीत  व पोलिसाच्या मारहाणीत अनेक मराठा बांधव गभीर जखमी झाले व पोलीस देखील जखमी झालेत पण पोलीसावर आंदोलकांनी पलटवार केलेला नाही या चेंगराचेंगरीत ते जखमी झालेत परंतु काही समज कंटक जखमी पोलिसांचे फोटो व्हायरल करून मराठा समाजात व पोलिसांत वाद निर्मान् करू पाहत आहेत ते निदनीय आहे समज कंटकांनी मराठा समाजाची बदनामी करणे अन्यथा अन्यथा त्याचेही पडसाद उमटतील असा इशारा मराठा समाजाचे कसारा चे पदाधिकारी रघुनाथ कदम यांनी दिला. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षण