शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

शिवरायांच्या अवमानाचा निषेध : भाजपाच्या श्रीपाद छिंदमच्या छायाचित्रांवर द्वारका येथे मारले जोडे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 3:28 PM

यावेळी कार्यकर्त्यांनी छिंदमच्याविरोधात निषेधाचे फलक झळकविले तसेच फलकावरील त्यांच्या छायाचित्राला काळं फासण्यात आले.

ठळक मुद्देछत्रपती शिवाजी मुस्लीम ब्रिगेडच्या वतीने ‘जोडे मारो’ आंदोलनछत्रपती शिवराय यांचा जयजयकारअवमानकारक वक्तव्याचा तीव्र निषेध छिंदमसारखी प्रवृत्ती ठेचून काढण्यासाठी स्वराज्यामधील मुस्लीम मावळे समर्थ

नाशिक : अहमदनगरचे भाजपचे उपमहापौर श्रीपाद छिंदम याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी काढलेल्या अपशब्दांचा निषेध छत्रपती शिवाजी मुस्लीम ब्रिगेडच्या वतीने ‘जोडे मारो’ आंदोलनाने करण्यात आला.द्वारका येथे शनिवारी दुपारी (दि.१७) मुस्लीम ब्रिगेडचे अजीज पठाण यांच्या नेतृत्वाखाली छिंदमच्या छायाचित्रावर जोडे मारण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवराय यांचा जयजयकार करत छिदम मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. यावेळी अजिज पठाण यांनी राज्य व केंद्र सराकरवर टीका करत शिवरायांच्या राज्यभिषेकाला विरोध करणा-या मनुवादी प्रवृत्तीचे सरकार सत्तेत आल्यानंतर शिवरायांसारख्या महापुरूषांचे अवमान करत प्रवृत्ती दाखवून देत आहे. छिंदमसारखी प्रवृत्ती ठेचून काढण्यासाठी स्वराज्यामधील मुस्लीम मावळे समर्थ असल्याचे पठाण म्हणाले.

या आंदोलनात जिजाऊ ब्रिगेडच्या माधुरी भदाणे, संभाजी ब्रिगेडचे विलास पाटील, इब्राहीम अत्तार, मुख्तार शेख, अन्सार शेख, रफीक साबीर आदिंनी सहभाग घेतला. यावेळी कार्यकर्त्यांनी छिंदमच्याविरोधात निषेधाचे फलक झळकविले तसेच फलकावरील त्यांच्या छायाचित्राला काळं फासण्यात आले. छिंदमवर कायदेशीर कठोर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. ऐन शिवजयंतीच्या तोंडावर छिदम यांनी केलेल्या भ्याड व अवमानकारक वक्तव्याचा तीव्र निषेध व्यक्त करत जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या.

टॅग्स :NashikनाशिकShripad Chindamश्रीपाद छिंदमShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज