शेतकऱ्यांच्या आंदोलनासाठी शहरात सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. काही राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र येऊन आंदोलनाची तयारी केली असतानाच पोलिसांना ताब्यात घेतले.
आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठी गर्दी होण्याची शक्यता वर्तविली जात होती. भारत बंदला भाजप वगळता इतर पक्षांनी पाठिंबा दिला होता. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समित्या या ठिकाणी पडसाद पहायला मिळाले. माकप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना व इतर पक्षांच्या नेते सीबीएस येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ एकत्र येत मोदी सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. या नेत्यांनी तेथून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आपला मोर्चा वळवला. मात्र आंदोलक तेथे पोहोचण्यापूर्वीच पेालिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
आंदोलनाची शक्यता लक्षात घेता जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वाचे काम असणाऱ्यांनाच प्रवेश दिला जात होता. आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले नंतर सोडून देण्यात आले.