नाशिकरोड : रेल्वेच्या खासगीकरणाच्या विरोधात नाशिकरोड रेल्वेस्थानकात शुक्रवारी दुपारी निषेधाच्या घोषणा देत भारतीय ट्रेड युनियन ‘सिटू’च्या वतीने निदर्शने करून निवेदन देण्यात आले.सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांच्या नेतृत्वाखाली नाशिकरोड रेल्वेस्थानकाच्या आवारामध्ये केंद्र शासनाने रेल्वे खासगीकरण निर्णय मागे घेण्यात यावा, या मागणीसाठी घोषणा देत निदर्शने करण्यात आली. नाशिकरोड रेल्वे स्थानकाचे प्रबंधक आर. के. कुठार यांना निवेदन देण्यात आले. केंद्र सरकार याप्रश्नी जनतेची फसवणूक करत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.यावेळी आंदोलनात सीटूचे जिल्हाध्यक्ष सीताराम ठोंबरे, सरचिटणीस देवीदास आडोले, संतोष काकड, दिनेश सातभाई, मोहन जाधव, सतीश खैरनार, हिरामण तेलोरे, गौतम कोंगळे, संजय पवार, तुकाराम सोनजे, स्वरुप वाघ आदीच्या सह्या आहेत.ल्या निवेदनात म्हटले आहे की, केंद्र शासनाने १०९ रेल्वेमार्गांवर १५१ रेल्वेगाड्या खासगीकरण करून त्या चालवण्यासाठी देशी-विदेशी कंपन्यांना निमंत्रित केले आहे. त्यामधून तीस हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होईल, जलद गतीने प्रवास होईल, प्रवासी भाडे कमी होईल असे केंद्र शासनाचे म्हणणे आहे; परंतु आत्तापर्यंतचा अनुभव बघता खासगी क्षेत्र स्वत: काहीच गुंतवणूक करत नाही, देशातल्या विविध बँकांतून मोठी कर्जे घेऊन काम करतात. खासगीकरणाच्या माध्यमातून कवडीमोल किमतीत शासनाची मालमत्ता लुटली जाते, त्यावर उद्योग चालवले जातात. त्यामुळे क आणि ड वर्गाची रिक्त पदे रद्द करण्याचे व नवीन पदनिर्मितीवर प्रतिबंध आणणारे परिपत्रक मागे घ्यावे. त्यामुळे केंद्र शासनाने रेल्वेचे खासगीकरण करण्याचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
रेल्वे खासगीकरणाविरोधात निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 12:52 AM