शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक आहे, मात्र केंद्र सरकार त्यांच्यावर बहुमताने आणि हुकूमशाही पद्धतीने कायदे लादत आहेत. शेतकऱ्यांना मारहाण करून वेठीस धरण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने करण्यात आला आहे. दिल्लीत कृषी कायदे रद्द करण्यासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ मोर्चाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले तसेच घोषणाबाजी करून निदर्शनेही करण्यात आली.
या आंदोलनात गणेश उन्हवणे, शशिकांत उन्हवणे, सुनील गांगुर्डे, सुनीता कर्डक, आनंद गांगुर्डे, साहेबराव भालेराव, शालिनी शेळके, मुरलीधर घेारपडे, देवीदास पवार,सखाराम साठे, विलास गुंजाळ, नितीन पगारे, भिकाजी सावंत, राहुल तेलारे, लक्ष्मीबाई गडगडे, सीताबाई कातकाडे, अलका निकम, गयाबाई काळे यांच्यासह अन्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.
===Photopath===
060221\06nsk_45_06022021_13.jpg
===Caption===
केंद्र शासनाने कृषी कायदे रद्द करावे या मागणीसाठी संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने शनिवारी (दि.६) नाशिकरोड येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने करताना गणेश उन्हवणे, शशीकांत उन्हवणे, सुनील गांगुर्डे, सुनीता कर्डक, आनंद गांगुर्डे, साहेबराव भालेराव, शालीनी शेळके, मुरलीधर घेारपडे, देवीदास पवार,सखाराम साठे, विलास गुंजाळ, नितीन पगारे, भिकाजी सांवत, राहुल तेलारे, लक्ष्मीबाई गडगडे, सिताबाई कातकाडे, अलका निकम, गयाबाई काळे आदी.