सटाणा : मानिसक आणि वैचारिक दुर्बलता काढून टाकल्याशिवाय जिंकणारा समाज निर्माण होणार नाही. समाजातील एखाद्याचे कौशल्य, वीरता सिद्ध करता येण म्हणजे जिंकण होय. ज्या दिवशी ही वीरता सिद्ध होईल तेव्हा त्याच्या पायावर संपूर्ण समाज नतमस्तक होतो, असे मत विद्या वाचस्पती विवेक घळसासी यांनी व्यक्त केले.येथील सहकारमहर्षी कै. वसंतराव दगाजी पाटील यांच्या पुण्यस्मरणानिमित्त पाटील चेरीटेबल ट्रस्टतर्फे दगाजी चित्रमंदिरमध्ये आयोजित वसंत व्याख्यानमालेत जिंकणारा समाज घडविण्यासाठी या विषयावर तिसरे पुष्प गुंफताना घळसासी बोलत होते. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी मविप्र समाज संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे तर प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष सुनील मोरे उपस्थित होते. अनुकूलतेवरच विजयाचे गणित अवलंबून असते. सामाजिकतेच्या भ्रामक कल्पनेतील विकृती माणसाला जिंकू देत नाहीत. पराभूत मानिसकतेतून माणसाने जिंकण्याची इच्छा धारण केली पाहिजे असे सांगून घळसासी पुढे म्हणाले की, जिंकणारा समाज निर्माण करताना पहिल्यांदा आपल्या डोक्यात भरलेल्या जाणीवपूर्वक उणीवा टाकून दिल्या पाहिजेत. अिस्तत्वाची मशाल पेटवताना आम्ही विकिसत होण्यासाठी जन्माला आलो आहोत, असे समाजमन तयार होण्याची गरज आहे. दीड हजार वर्षांपासून आपण अंधाराची चर्चा करत बसलो तर प्रकाशाचे स्वप्न पडणार कधी ? कोणतीही सेवा शोषण नाही. सेवा सामर्थ्याची गोष्ट बनू शकते. मनुष्याला पापाची निर्मिती मानणारे समाज घडवू शकत नाही. त्यासाठी मानिसक, वैचारिक दौर्बल्य फेकून दिले पाहिजे. विकृतीयुक्त समाज व भेदाभेदांच्या भिंती समाजात उभ्या राहिल्यानेच हरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. आपल्या समाजाची विकृती, दुर्बलता शोधत राहिलो तर जिंकण्याचे उत्तर कधीही सापडणार नाही, असेही घळसासी यांनी स्पष्ट केले.ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील यांनी प्रास्ताविक करून आभार मानले. कार्यक्र मास द्वारकाबाई पाटील, डॉ. शुभदा माजगावकर, डॉ. सौ. शहा, डॉ. सौ. येवलकर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख लालचंद सोनवणे, प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे, प्रल्हाद पाटील, कल्याणराव भोसले, बाळासाहेब मराठे, व्ही. डी. सोनवणे, दि. शं. सोनवणे, प्रा. बी. डी. बोरसे, विश्वास चंद्रात्रे, डॉ. विजया पाटील, मनीषा पाटील, अनुराधा मराठे, सरोज चंद्रात्रे, समीर पाटील, आदींउपस्थित होते. प्रा. जितेंद्र मेतकर यांनी सूत्रसंचालन केले.
वीरता सिद्ध करणे म्हणजे जिंकणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 6:31 PM
मानिसक आणि वैचारिक दुर्बलता काढून टाकल्याशिवाय जिंकणारा समाज निर्माण होणार नाही. समाजातील एखाद्याचे कौशल्य, वीरता सिद्ध करता येण म्हणजे जिंकण होय. ज्या दिवशी ही वीरता सिद्ध होईल तेव्हा त्याच्या पायावर संपूर्ण समाज नतमस्तक होतो, असे मत विद्या वाचस्पती विवेक घळसासी यांनी व्यक्त केले.
ठळक मुद्देविवेक घळसासी धामणे दांपत्यास यंदाचा वसंत गौरव