मालेगाव : धुळे व नाशिक जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. सरकारी व खासगी रुग्णालयांत रेमडेसिवीर इंजेक्शनची कमतरता भासत असून, नागरिकांना रेमडेसिवीर इंजेक्शन मिळविण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. यासाठी खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी दिल्ली येथे जाऊन केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. निवेदनात म्हटले आहे की, धुळे व नाशिक जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र कोरोना महामारीच्या संकटात सापडलेला आहे. मोठ्या प्रमाणावर रुग्णसंख्या वाढत आहेत. सरकारी व खासगी रुग्णालयात रेमडेसिवीर इंजेक्शनची कमतरता भासत आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा पुरेसा नसल्यामुळे काही रुग्णांना आपला प्राण गमवावा लागत आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनचा मुबलकसाठा उपलब्ध करून द्यावा, यासाठी हर्षवर्धन यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे भामरे यांनी सांगितले.
रेमडेसिवीर इंजेक्शनचा मुबलक साठा उपलब्ध करून द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2021 4:14 AM