---
मनसेकडून पूरग्रस्तांना मदत रवाना
नाशिक : कोकणात विविध भागात महापुरामुळे हजारो नागरिकांचे नुकसान झाले आहे. त्यांच्या मदतीसाठी नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष अंकुश पवार यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मदतीचे साहित्य गुरुवारी (दि. २९) रवाना केले. सात हजार किलो तांदूळ, अडीच हजारपेक्षा अधिक पाणी बाटल्या तसेच बेसन पीठ, बिस्किटे, फरसाण, फिनाईल, सॅनिटायझर आदी साहित्य पाठविण्यात आले. यावेळी भाऊसाहेब निमसे, योगेश लभडे, सचिन सिन्हा, अक्षय खांडरे, अजिंक्य बोडके, चारूदत्त भिंगारकर आदी उपस्थित होते.
छायाचित्र आर फेाटोवर २९ एमएनएस
----
थुंकणाऱ्यांवर कारवाई बंद
नाशिक : महापालिकेने कोरोना काळात आरेग्य नियमांचे पालन करण्यावर भर दिला आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली हेाती. मात्र, निर्बंध शिथल होताच अनेक कारवाई कमी झाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर महापालिकेने एकही कारवाई केलेली नाही तर दुसरीकडे पोलिसांनीदेखील पाच जणांवरच कारवाई केली आहे.