द्याने : येथील अंगणवाडी केंद्र-२ मध्ये गायत्री कापडणीस यांचे ओटीभरण करण्यात आले. सरपंच लताबाई कापडणीस, उपसरपंच मधुकर कापडणीस, मुख्यसेविका संध्या धोंडगे यांच्यासह गावातील महिला उपस्थित होत्या. यावेळी संध्या धोंडगे यांनी गरोदरमातेने घ्यावयाची काळजी, सकस व चौरस आहार, बाळाची योग्य वाढ, बाळ गर्भात असताना घ्यावयाची काळजी याबाबत माहिती दिली. मातेने वेळोवेळी लसीकरण करणे महत्त्वाचे आहे, असे सांगण्यात आले. अंगणवाडी सेविका मनीषा कापडणीस यांनी गरोदरमातांनी गरोदरपणात कशी काळजी घ्यावी, याबाबत माहिती दिली. यावेळी वत्सलाबाई कापडणीस, पूजा कापडणीस, रोशनी थोरात, शीतल खरे, मनीषा नेरकर, भारती पिंपळसे, सारिका पिंपळसे, सविता कापडणीस, सेविका मनीषा कापडणीस, मदतनीस ज्योत्स्ना कापडणीस, सेविका कविता कापडणीस, मदतनीस कल्पना कापडणीस आदि उपस्थित होत्या. (वार्ताहर)
द्याने येथे अंगणवाडीत ओटीभरण
By admin | Published: August 27, 2016 10:24 PM