लोकमत न्यूज नेटवर्कनिफाड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयात येणाऱ्या नागरिकांना योग्य ती सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी सूचना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी केल्या आहेत. सुविधांबाबत आढावा घेण्यासाठी निफाड उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन त्यांनी माहिती घेतली.यावेळी निफाड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनील राठोर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नवलसिंग चव्हाण व इतर आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. क्षीरसागर यांनी याप्रसंगी सूचना देताना निफाड शहरात बाहेरील जिल्हातून येणाºया मुख्यत: मुंबई व पुणे येथील नागरिकाबाबत उपजिल्हा रुग्णालय व निफाड नगरपंचायत यांनी संयुक्तपणे मोहीम राबवून संबंधित नागरिकाचा शोध घेऊन त्याला योग्य ती आरोग्यसेवा सुविधा उपलब्ध करून द्यावी या व इतर सूचना दिल्या या रोगाचा प्रसार होऊ नये यासाठी नागरिकांनी कुठेही गर्दी करू नये, असे आवाहन त्यांनी केले.प्रतिबंधात्मक उपाययोजना व केलेली तयारी याची माहिती देताना या रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनील राठोर यांनी सांगितले की, या रुग्णालयात येणाºया सर्वच रु ग्णामध्ये कोरोना आजाराबाबत जनजागृती अधिक प्रमाणात व्हावी याकरिता दर्शनी भागात माहिती फलक व कोरोना माहिती केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहे. एकावेळेस फक्त ५ रुग्णांना तपासणीसाठी प्रवेश दिला जात आहे. तोपर्यंत इतर रुग्णांना आयुष गार्डनमध्ये प्रतीक्षा करण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोनाबाबत उपाययोजना करण्यासाठी सज्जता ठेवण्यात आली आहे. या बैठकीला तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नवलसिंग चव्हाण, डॉ. चंद्रहास पाटील, डॉ. संकेत आहेर, डॉ. कटारे, वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिका व कर्मचारी उपस्थित होते.
योग्य ती आरोग्यसेवा सुविधा द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2020 10:00 PM
लोकमत न्यूज नेटवर्क निफाड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयात येणाऱ्या नागरिकांना योग्य ती सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी सूचना जिल्हा ...
ठळक मुद्देबाळासाहेब क्षीरसागर : निफाड उपजिल्हा रुग्णालयास भेट