आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपळगाव निपाणी या प्रशाळेत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सावित्री बहुउद्देशीय फाउण्डेशन या संस्थेतर्फे माजी प्राचार्य त्र्यंबक भागवत व संस्थेचे कार्याध्यक्ष मुक्तेश्वर मुनशेट्टीवार यांच्या हस्ते संस्थेने दत्तक घेतलेली विद्यार्थिनी प्रियंका अशोक कर्डकला पाच हजार रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. प्रास्ताविक विद्यालयाचे उपशिक्षक आर.पी. उगले यांनी, तर सूत्रसंचालन उपशिक्षक एस.जे. दुकळे यांनी केले. आभार विद्यालयाच्या उपशिक्षिका श्रीमती भाटजिरे यांनी मानले.
दरम्यान, साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ, नाशिकरोड संचलित आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पिंपळगाव निपाणी या प्रशाळेच्या वतीने नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार, तर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. याप्रसंगी पिंपळगाव निपाणी व सावळी ग्रुप ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच शिवाजी चिंधू खाडे, उपसरपंच व सदस्य यांचा सत्कार प्राचार्या श्रीमती एस.के. बोराडे यांच्या हस्ते करण्यात आला.
कॅप्शन : दत्तक विद्यार्थिनी प्रियंका कर्डक हिला शिष्यवृत्ती प्रदान करताना मुक्तेश्वर मुनशेट्टीवार. समवेत प्राचार्य एस.के. बोरोडे,आर.पी. उगले, एस.जे. दुकळे. भाटजिरे आदी.