नाशिक रोड : रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांसाठी अत्यावश्यक असलेल्या ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटरसाठी वीजपुरवठा अखंडित सुरु ठेवा, अशी मागणी भाजपच्यावतीने देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
भारतीय जनता पक्षातर्फे महावितरणचे नाशिक परिमंडळाचेे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहेे की, कोरोनाची दुसरी लाट ही अत्यंत जीवघेणी सिद्ध होत आहे. रुग्णांचा वाढता आकडा पाहता, सरकारी व खासगी रुग्णालयांमध्ये खाटांची संख्या कमी पडू लागली आहे. कोरोनाबाधित रुग्णांसाठी वैद्यकीय उपचारांसोबत ऑक्सिजन पुरवठासुध्दा तितकाच महत्त्वाचा आहे. आपल्या घरात उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर हे संजीवनी ठरत आहे. परंतु, त्यासाठी अखंड वीजपुरवठा अत्यावश्यक असून, काही मिनिटांसाठी वीजपुरवठा खंडित झाला तरी प्राणवायूअभावी मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांचे मृत्यू होऊ शकतात. ही संभाव्य दुर्घटना टाळण्यालाठी नाशिक विभागात अखंडित वीजपुरवठा सुरु ठेवण्यासाठी योग्य नियोजन केल्यास प्राणवायूवर असलेल्या कोरोना रुग्णांना मोठा दिलासा मिळेल, असेेे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर भाजप नाशिक रोड मंडल अध्यक्ष हेमंत गायकवाड, शहर चिटणीस राजेश आढाव, सरचिटणीस विनोद खरोटे, किऱण पगारे, संदीप शिरोळे, राम डोबे, गौरव विसपुते, ओंकार लभडे, विशाल पगार, गौरव विसपुते, अशोक गवळी, भूषण शहाणे, पुनित कांकरिया, करण गायकवाड, प्रतिम संघवी, आदींच्या सह्या आहेत.
(फोटो ३० वीज)- महावितरणचेे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांना भाजपचे हेमंत गायकवाड, राजेश आढाव, विनोद खरोटे किरण पगारे, संदीप शिरोळे आदींनी निवेदन दिले.