शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

सध्याच्या लोकसंख्येनुसार टॅँकरने पाणी पुरवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2019 5:37 PM

सिन्नर : शासनाकडून २०११ च्या लोकसंख्येनुसार टॅँकरने माणसी पाणीपुरवठा केला जातो. मात्र गेल्या काही वर्षात लोकसंख्या वाढली आहे. जुन्या लोकसंख्येनुसार पाणी पुरत नाही.

सिन्नर : शासनाकडून २०११ च्या लोकसंख्येनुसार टॅँकरने माणसी पाणीपुरवठा केला जातो. मात्र गेल्या काही वर्षात लोकसंख्या वाढली आहे. जुन्या लोकसंख्येनुसार पाणी पुरत नाही. त्यामुळे सध्याची लोकसंख्या विचारात घेऊन टॅँकरने पाणीपुरवठा करावा असा ठराव पंचायत समितीच्या मासिक आढावा बैठकीत करण्यात आला.पंचायत समितीचे सभापती भगवान पथवे यांच्या अध्यक्षतेखाली लोकनेते गोपीनाथ मुंडे सभागृहात पंचायत समितीची मासिक आढावा बैठक पार पडली. व्यासपीठावर उपसभापती जगन्नाथ भाबड, शिवसेनेचे गटनेते संग्राम कातकाडे, भाजपाचे गटनेते विजय गडाख, सदस्य रवींद्र पगार, तातू जगताप, शोभा बर्के, योगिता कांदळकर, संगिता पावसे, गटविकास अधिकारी लता गायकवाड आदि उपस्थित होते.आढावा बैठकीत कृषी, पाणीपुरवठा, वीज, लघुपाटबंधारे, शिक्षण यांच्यासह विविध विषयांचा आढावा घेण्यात आला. सध्या तालुक्यात ३७ टॅँकरद्वारे १६ गावे व १९४ वाड्यावस्त्यांना टॅँकरने पाणीपुरवठा सुरु आहे. त्यात ६ खासगी व ३१ शासकीय टॅँकरचा समावेश आहे. देवपूर, पंचाळे, सोनारी, श्रीरामपूर- शिंदेवाडी या गावातील वाड्यावस्त्यांचे टॅँकर मागणीचे प्रस्ताव प्रांत कार्यालयात पाठविण्यात आले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

टॅग्स :Waterपाणी