शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा नाही, लोकसभेवेळच्या एकमेकांवरील परोपकारावरून ठाकरे-काँग्रेसचे जागावाटप अडले? नेमके काय घडले...  
2
भारत-चीनमधील सीमावाद संपणार! दोन्ही देशांमध्ये LAC वर गस्तीबाबत झाला महत्त्वाचा करार
3
उद्धव ठाकरे दोन आमदारांचे तिकीट कापणार? पक्षफुटीवेळी राहिले होते सोबत; 'मातोश्री' गाठली
4
Elon Musk यांनी आणलाय Dream Job! घर बसल्या दर तासाला मिळतील ₹5000, करावं लागेल फक्त एवढं काम
5
कल्याण पूर्वेत महायुतीचा वाद विकोपाला; महेश गायकवाड निवडणूक लढण्याच्या तयारीत
6
करवा चौथसाठी पती घरी उशिरा आल्याने वाद, पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल, पतीनेही संपवलं जीवन
7
Hero ची 'शुभ मुहूर्त' ऑफर, स्कूटर खरेदीवर मिळतील 15000 रुपयांचे बेनिफिट्स!
8
माय-लेकीच्या जोडीची कमाल! ५ हजारांत सुरू केली कंपनी; आज महिन्याला लाखोंची कमाई
9
Jio Vs Vi: पाहा जिओ आणि व्हीआयचा ६६६ रुपयांचा प्लॅन; कोणता घेण्यात तुमचा जास्त फायदा?
10
"काल रात्री फोनवरून चर्चा झाली, आता..."; मविआचं काय ठरलं? वडेट्टीवारांनी गोंधळ संपवला
11
श्वेता शिंदेने साजरी केली करवा चौथ, पती आहे प्रसिद्ध हिंदी अभिनेता, तुम्ही पाहिलंत का?
12
माँटी इंग्लंडमध्ये, गोल्डी कॅनडात, लखा पोर्तुगालमध्ये... लॉरेन्स बिश्नोईचे साथीदार कोणत्या देशात लपलेत?
13
"सलमान खानला मारण्यासाठी गार्डसोबत मैत्री..."; बिश्नोई गँगच्या शूटरचा मोठा खुलासा
14
Astro Tips: फक्त २ लवंगा करतील तुमच्या अडचणी दूर; सोमवारी न चुकता करा 'हा' उपाय!
15
रत्नागिरीकरांना बदल हवाय, विद्यमान आमदार नको' उदय सामंतांबाबत भाजप नेत्याचा दावा
16
"उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावं, आम्ही तुमच्यासोबत"; यशोमती ठाकूर यांचे मोठं विधान
17
संविधानातून 'धर्मनिरपेक्ष' आणि 'समाजवादी' शब्द काढले जाणार? सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
18
प्यार तूने क्या किया! करवाचौथला घरी नव्हता नवरा; बायकोने बॉयफ्रेंडसोबत केलं लग्न
19
"नव्या जोडप्यांनी 16-16 मुलं जन्माला घालावीत, कारण..."; CM चंद्रबाबूंनंतर, आता स्टॅलिन यांचंही अजब आवाहन
20
Gold Silver Price Today : सोन्याचे दर गगनाला भिडले; चांदी एकाच दिवसात ४८८४ रुपयांनी महागली

पुनश्च हरिओम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2020 12:25 AM

तब्बल अडीच महिन्यांनंतर सोमवारपासून अधिकृतरीत्या लॉकडाऊन उठल्याने खऱ्या अर्थाने महानगरातील सर्व बाजारपेठांमधील दुकाने खुली झाली. ग्राहक पुन्हा पूर्वीसारखेच प्रतिसाद देतील, या विश्वासावर दालने सुरू झाली असून, बाजारपेठेत नागरिकांची गर्दीदेखील आहे. मात्र, जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीलाच नागरिकांकडून प्राधान्य दिले जात आहे.

ठळक मुद्देनवी पहाट : दालने, दुकाने पूर्ववत खुली; फिजिकल डिस्टन्सिंंगचा फज्जा

नाशिक : तब्बल अडीच महिन्यांनंतर सोमवारपासून अधिकृतरीत्या लॉकडाऊन उठल्याने खऱ्या अर्थाने महानगरातील सर्व बाजारपेठांमधील दुकाने खुली झाली. ग्राहक पुन्हा पूर्वीसारखेच प्रतिसाद देतील, या विश्वासावर दालने सुरू झाली असून, बाजारपेठेत नागरिकांची गर्दीदेखील आहे. मात्र, जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीलाच नागरिकांकडून प्राधान्य दिले जात आहे.दरम्यान, वाढत्या गर्दीने शहरातील विविध मार्गांवर आणि दुकानांमध्ये फिजिकल डिस्टन्ंिसंगचा अक्षरश: फज्जा उडाला. याशिवाय अनेकांनी चेहºयाला नावालाच मास्क लावले होते. वाढत्या गर्दीमुळे ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी देखील झाली होती.शासनाने अधिकृतरीत्या सोमवारपासून परवानगी दिली असली तरी त्यापूर्वीच शनिवारी आणि रविवारीदेखील बहुतांश दुकाने उघडली होती. त्यामुळे गत आठवड्यातील अखेरच्या दोन्ही दिवसांमध्ये नाशिकच्या मुख्य रस्त्यांनी पुन्हा एकदा वाहतूक कोंडीचा अनुभव घेतला. दालनात पुन्हा ग्राहक परतू लागल्याने दुकानांमधील विक्री प्रतिनिधीदेखील त्यांचे सारे कौशल्य पणाला लावून ग्राहकांना मालाची विक्री करीत आहेत. सर्व प्रमुख दुकाने, दालने पूर्ववत सुरू झाल्याने नागरिकांनी या मुख्य बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी केल्याचे दिसून आले.पावसाळ्याला प्रारंभ होत असतानाच अधिकृतरीत्या दुकाने सुरू करण्यास परवानगी मिळाल्याने दुकानदारांनीदेखील सोमवारी लवकरच दालने खुली केली. संचारबंदी लागण्यापूर्वीच्या दिवसांसारखीच खरेदीसाठी गर्दी नागरिकांकडून केली जात होती. फक्त नागरिकांकडून मास्कच्या वापराबाबत काळजी घेतली जात होती. नागरिकांनी प्रामुख्याने किराणा सामान, भाजी, फळेखरेदी त्याचबरोबर पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर छत्र्या, रेनकोट खरेदीलादेखील प्राधान्य दिल्याचे दिसून येत होते. आर्थिकचक्र पुन्हा सुरळीत सुरू झाल्याने जीवनावश्यक वस्तूंबरोबरच अन्य गरजेच्या वस्तूंची खरेदी करण्याकडेदेखील नागरिक पुन्हा वळतील, अशी विक्रेत्यांना आशा वाटू लागली आहे.‘त्या’ दुकानदारांवर होणार कारवाईमहापालिकेने शहरातील बाजारपेठा सम आणि विषम अशा पद्धतीने खुली करण्यास परवानगी दिली असली तरी अरुंद मार्गांवरदेखील सर्व दुकाने सर्रास सुरू आहे. त्याची दखल घेत महापालिका आयुक्तांनी नियमभंग करणाºया बाजारपेठा बंद करून संबंधित दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात विभागीय अधिकाऱ्यांना कारवाई करण्यास सांगण्यात आले आहे. महापालिकेने ३० ते ३५ व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली आणि त्यांना नियमावलीबाबत अवगत केले होते. मात्र सर्वांना नियम कळावा म्हणून दोन दिवस प्रतीक्षा केली. परंतु आता मात्र नियम भंग करणाºयांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती उपायुक्त प्रदीप चौधरी यांनी दिली.

टॅग्स :NashikनाशिकCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक