नाशिक : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वात ज्यांनी अढळस्थान निर्माण केले आहे अशा पु. ल. देशपांडे यांच्या साहित्यातील विविध व्यक्तिरेखा, घटना, प्रसंग चित्रांच्या सहाय्याने रेखाटत त्यांचा साहित्यप्रवास मांडण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातील विविध कलाकारांनी केला असून, पुलंची ही विविध रूपं साहित्य व कलाप्रेमींसाठी मेजवानी ठरत आहे.पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त कुसुमाग्रज स्मारकात सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे मंगळवारपासून (दि.१२) चित्रप्रदर्शन सुरू झाले असून, चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन छायाचित्रकार प्रसाद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष संजय पाटील, लोकेश शेवडे, ज्येष्ठ नाट्यकर्मी सुरेश गायधनी, कवी किशोर पाठक, मिलिंद शिंदे, समन्वयक राजेश जाधव, मीना वाघ, अमोल थोरात, अजय तारगे, हेमंत गव्हाणे आदी उपस्थित होते. या प्रदर्शनातून पु. ल. देशपांडे यांचा साहित्यपटच या उलगडण्याचा प्रशंसनीय प्रयत्न करण्यात आल्याचे मत प्रसाद पवार यांनी यावेळी व्यक्त केले. या प्रदर्शनातून रविश धनवडे, मोहित जोशी, विजयराज बोधनकर, पराग बोरसे, नितीन खिलारे, मनोज सताळे, विशाल वाड्ये, गोपाळ देऊसकर, पारूल शहा, स्नेहल पागे, दिलीप दुधाने, प्रमोद कुर्लेकर यांनी विविध चित्रकृतींमधून पुलंच्या विनोदी साहित्याचे दर्शनही रसिकांना घडविणाचा प्रयत्न केला असून, प्रदीप शिंदे, चंद्रजित यादव यांची शिल्पेही कलारसिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. हे प्रदर्शन गुरुवारपर्यंत (दि.१३) सकाळी ११ ते रात्री साडेआठ यावेळेत सर्वांसाठी खुले राहणार आहे.प्रदर्शनात पु. ल. देशपांडे यांचे चित्रमय स्वगतही मांडण्यात आले असून, त्यांची ३३ विविध पुस्तकेही येथे साहित्य रसिकांसाठी ठेवण्यात आली आहेत. यात म्हैस, असा मी, असा मी, मी आणि माझा शत्रुपक्ष, पाळीव प्राणी, बिगरी ते मॅट्रिक अशा विविध साहित्यकृतींचा समावेश असून, वेगवेगळ्या चित्रकृतींमधून त्यांच्या विविध व्यक्तिरेखा आणि प्रसंगही साकारण्यात आले आहे.
पु. ल. यांच्या विविध छटा उलगडणारे शिल्पप्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 12:56 AM
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वात ज्यांनी अढळस्थान निर्माण केले आहे अशा पु. ल. देशपांडे यांच्या साहित्यातील विविध व्यक्तिरेखा, घटना, प्रसंग चित्रांच्या सहाय्याने रेखाटत त्यांचा साहित्यप्रवास मांडण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातील विविध कलाकारांनी केला असून, पुलंची ही विविध रूपं साहित्य व कलाप्रेमींसाठी मेजवानी ठरत आहे.
ठळक मुद्देउद्घाटन : महाराष्ट्रातील नामवंत कलावंतांची हजेरी; कलाप्रेमींसाठी मेजवानी