नाशिक : बाल दिनाच्या पूर्वसंध्येला चाईल्डलाईन मविप्रचे समाजकार्य महाविद्यालय यांच्यातर्फे भारतनगर वसाहत परिसरातून बालविवाह, बाल लैंगिक शोषण, बाल कामगार प्रतिबंध, बेटी बचाओ आदी समस्यांविषयी जनजागृती करण्यासाठी वेगवेगळ्या घोषवाक्यांसोबत लहान मुलांची फेरी काढण्यात आली. यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन व केक कापून मुलांसोबत बाल दिन साजरा करतानाच बाल दिन सप्ताहाचीही सुरुवात करण्यात आली.बाल दिन सप्ताहानिमित्त व ‘चाईल्ड से दोस्ती’ उपक्रमांतर्गत त्यानंतर चाईल्डलाईनच्या समुपदेशक सुवर्णा वाघ यांनी मार्गदर्शन केले. विजया शिंदे यांनी मुलांना बालदिनाचे महत्त्व समजावून सांगितले. मुलांनीही विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. याप्रसंगी शहरी आरोग्य केंद्राच्या डॉ. रोहिणी भगत, चाईल्डलाईनच्या शहर समन्वयक प्रणिता तपकिरे आणि केंद्र समन्वयक प्रवीण आहेर आदी उपस्थित होते.
बालकांच्या प्रश्नांवर जनजागृती फेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 1:34 AM
बाल दिनाच्या पूर्वसंध्येला चाईल्डलाईन मविप्रचे समाजकार्य महाविद्यालय यांच्यातर्फे भारतनगर वसाहत परिसरातून बालविवाह, बाल लैंगिक शोषण, बाल कामगार प्रतिबंध, बेटी बचाओ आदी समस्यांविषयी जनजागृती करण्यासाठी वेगवेगळ्या घोषवाक्यांसोबत लहान मुलांची फेरी काढण्यात आली.
ठळक मुद्देबाल दिन : जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन