मेशी : देवळा तालुक्यातील डोंगरगाव येथील हभप कृष्णाजी माऊली विदयालयातून जलदिंडी काढून जनजागृती अभियान राबविण्यात आले. मुख्याध्यापक एस. के. सावंत यानी मानवी जीवनात पाण्याचे अनन्यसाधारण महत्व असल्याचे सांगितले. त्याचबरोबर पाणी बचतीचे आवाहन केले. त्यानंतर गावातून विद्यार्थ्यांनी वाजतगाजत जलदिंडी काढली. यावेळी कलशधारी मुली आणि पाणी बचतीविषयीचे बॅनर सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होते. यावेळी विद्यार्थ्यांनी घोषणाही दिल्यात. यावेळी सरपंच दयाराम सावंत, उपसरपंच विनोद सावंत, जेष्ठ शिक्षक ई.एम. सावळा, एन. के. आहेर, आर. डी. मगर, एम. एम.चाबुकसवार, एस. जे.सावंत, डी. के. देवरे, डी. ए. ठाकरे आदींसह विद्यार्थी , ग्रामस्थ उपस्थित होते.
डोंगरगाव विद्यालायातर्फे जलदिंडी काढून जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 1:05 PM